लायन्स क्लब ऑफ मालवण यांच्यावतीने देऊळवाडा शाळेला ब्ल्यू टूथ स्पीकर.
मालवण | प्रतिनिधी : मालवण लायन्स क्लबच्या वतीने मालवण शहरातील देऊळवाडा प्रशालेस नवरात्री उत्सवातील श्री. सरस्वती देवी पूजनाचे औचित्य साधून शाळेला आवश्यक ब्ल्यू टुथ स्पीकर भेट देण्यात आला. शाळेत विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येतात. शालेय कार्यक्रमाना आवश्यक असणारा ब्ल्यू टूथ स्पीकर भेट देण्यात आला. शाळा प्रशासनाने लायन्स क्लब ऑफ मालवणचे आभार मानले.
यावेळी लायन्स क्लब मालवणचे अध्यक्ष महेश अंधारी, खजिनदार पल्लवी खानोलकर, जेष्ठ शिक्षिका आणि लायन्सच्या सदस्य सौ. जयश्री हडकर, मोहन पटेल, मुकेश बावकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. श्वेता यादव यांसह सहकारी वर्ग, विद्यार्थी वर्ग, पालक वर्ग उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)