ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
अभिनेत्री कल्पना बांदेकर यांना राज्यस्तरीय पुरस्कार.

अभिनेत्री कल्पना बांदेकर यांना राज्यस्तरीय पुरस्कार.

प्रकाशन: 07 Oct 2024 11:52 PM
वाचन संख्या 106

राज्यभरातून होत आहे अभिनंदन.

सिंधुदुर्ग | ब्युरो न्यूज : सावंतवाडी येथील चतुरस्त्र अभिनेत्री, साहित्यिक कल्पना बांदेकर यांना राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार जाहीर झाला आहे. कलावंत विचारमंच, कमल फिल्म प्राॅडक्शन यांच्यावतीने दिला जाणारा तसेच, कमल अमृत नृत्य, कमल उद्योग समूह यांच्या सौजन्याने लोककवी वामनदादा कर्डक, भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके, कवी वसंत बापट, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंती आणि स्मृतीदिनानिमित्त देण्यात येणारा हा राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार आहे.

४२ विविध पुरस्कारांमध्ये सिंधुदुर्गातून कल्पना बांदेकर यांना हा पुरस्कार जाहीर झालाय. नाशिक येथे अध्यक्ष सुनील मोंढे यांच्या हस्ते १३ ऑक्टोबरला या पुरस्काराने कल्पना बांदेकर यांना सन्मानित केलं जाईल.

कल्पना बांदेकर गेली ३ दशके कला क्षेत्रात कार्यरत आहेत. नाट्य, एकांकिका, लघु चित्रपट, मालिका, बेव सिरीज, सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमात त्यांनी काम केले आहे. याचबरोबर मालवणी कविता, लिखाण, बाल कविता त्यांच्या प्रसिद्ध आहेत. साहित्य क्षेत्रातही त्यांचे भरीव तथा सक्रीय योगदान आहे. कल्पना बांदेकर यांच्यावर राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स