ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
रोणापाल माऊली मंदिर येथे नवरात्रोत्सव २०२४ निमित्त  विविध कार्यक्रम.

रोणापाल माऊली मंदिर येथे नवरात्रोत्सव २०२४ निमित्त विविध कार्यक्रम.

प्रकाशन: 04 Oct 2024 03:26 PM
वाचन संख्या 62

बांदा | राकेश परब : श्री देवी माऊली सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ रोणापाल तर्फे गुरुवार दि. ३ ते शुक्रवार ११ऑक्टोबर पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज दुपारी १२ वा. आरती व महाप्रसाद होईल. गुरुवार ३ व शुक्रवारी ४ रोजी संध्या ७ वा. स्थानिक भजने, शनिवार ५ रोजी दयासागर छात्रालय रोणापाल व स्थानिक मुलांचे कार्यक्रम, रविवार ६ रोजी विघ्नहर्ता दशावतार नाट्य मंडळ निगुडे यांचा दशावतारी नाट्यप्रयोग, सोमवार ७ रोजी संध्या. ७ वा. स्वरसंध्या मैफिल, मंगळवार ८ रोजी संध्या ७ वा. श्रीदेवी भूमिका दशावतार लोककला नाट्य मंडळ मळगाव (नितीन आशियेकर) यांचा नाट्यप्रयोग होणार आहे. बुधवार ९ रोजी संध्या. ७ वा. दांडिया नृत्य, गुरुवार 1१०रोजी संध्या. ७ वा. जादूगर अवधूत कलामंच (चिपळूण) यांचे जादूचे प्रयोग होणार आहेत. शुक्रवार ११ रोजी खास महिलांकरिता खेळ पैठणीचा (होम मिनिस्टर) कार्यक्रम होईल. शुक्रवारी १२ रोजी दुपारी २ वा. पावणी, देवलग्न व दसरोत्सव होणार आहे.

सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन श्रीदेवी माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळ रोणापाल तर्फे करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स