ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
गव्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी.

गव्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी.

प्रकाशन: 03 Oct 2024 07:29 PM
वाचन संख्या 303

शिरगांव राकसघाटी परिसरातील आठ महिन्यातील चौथी अपघाती घटना.

शिरगांव | संतोष साळसकर : देवगड – नांदगांव मार्गावर शिरगांव – राकसघाटीच्या तीव्र वळणावर गवारेड्याच्या हल्ल्यात हडपीड येथील शशांक प्रकाश राणे (३० वर्षे) हे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. गेल्या आठ महिन्यातील ही चौथी घटना आहे. शशांक राणे हे काल रात्री देवगडहून दुचाकीने आपल्या हडपीड येथील घरी जात असताना शिरगांव – राकसघाटी येथील धोकादायक वळणावर गवारेड्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. या हल्ल्यात त्यांचा चेहरा, खांदा, दोन्ही हात तसेच पायालाही दुखापत झाली आहे. त्यांच्यावर शिरगांव येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. तसेच दुचाकीच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

शशांक राणे हे हडपीडचे सरपंच संध्या राणे व समाजकल्याणचे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी प्रकाश राणे यांचे धाकटे चिरंजीव आहेत. देवगड – नांदगांव मार्गावर शिरगाव- राकसघाटी येथील वेडीवाकडी वळणांचा घाटरस्ता आहे.रस्त्याच्या दुतर्फा जंगलमय भाग असून या परिसरात गव्यांचा सायंकाळ नंतर रात्री उशिरापर्यंत वावर असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. गवारेड्याच्या या हल्ल्यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स