ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनसवर मुंबईतील पहिले रेस्तराँ ऑन व्हील सुरु...!

छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनसवर मुंबईतील पहिले रेस्तराँ ऑन व्हील सुरु...!

प्रकाशन: 23 Oct 2021 02:28 AM
वाचन संख्या 55

ब्युरो न्यूज | विवेक परब : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मुंबईतले पहिले ऑन व्हील रेस्तराँ सुरू करण्यात आले आहे. मध्य रेल्वेने रेल्वेच्या जुन्या डब्याचे रूपांतर रेस्तराँमध्ये केले आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लोहाटी यांनी या बद्दल माहिती दिली आहे.
जे डब्बे रेल्वेसाठी उपयुक्त नाहीत अशा डब्यांचे आता रेस्तराँमध्ये रुपांतर होईल. या रेस्तराँचे कंत्राट निविदेद्वारे देण्यात येईल. विशेष बाब म्हणजे हे रेस्तराँ चोवीस तास खुले राहणार आहे. या रेस्तराँमध्ये ग्राहक कधीही येऊन खाद्य पदार्थांची चव चाखू शकतात.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी मुंबईचे फर्स्ट ऑन व्हील रेस्तराँ खुले करण्यात आले आहे. हे रेस्तराँ प्लॅटफॉर्म क्रमांक १८ च्या प्रवेशद्वाराजवळ आहे. या रेस्तराँमध्ये एकावेळी ४० जण जेवणाचा आस्वाद घेऊ शकतील.
रेस्तराँमध्ये व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतील. डाइन इन व्यतिरिक्त या ठिकाणी मिनी कँफे व ज्यूससाठी एक स्वतंत्र टेक अवे विन्डो सुद्धा उपलब्ध असणार आहे. या रेस्तराँमध्ये दोन स्वतंत्र विभाग असतील. या ठिकाणी तुम्ही बसून सुद्धा खाऊ शकता किंवा उभे राहून सुद्धा वडापाव किंवा समोसा या सारख्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.
रेल्वे डब्याच्या आतील भागात विशिष्ट प्रकारची रंगरंगोटी करण्यात आली आहे. तसेच रेल्वे थीमसह मुंबईतील महत्त्वाची ठिकाणे सुद्धा डब्यात दर्शवण्यात आली आहेत. रेस्तराँमध्ये सुरक्षित अंतराचे पालन करुन ही व्यवस्था सुरु केली आहे.

तसेच रेस्तराँ नियमित सुरु झाल्यावर लोकांना ऑनलाइन अॅप्सद्वारे द्वारे देखील खाद्यपदार्थ मागवता येतील. तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण ,बोरिवली आणि शहरातील इतर ठिकाणी सुद्धा अशी रेस्तराँ सुरु करण्याचा विचार सुरु आहे.

Article image

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स