ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
म्हापण येथे नवरात्रोत्सव निमित्ताने विविध कार्यक्रम.

म्हापण येथे नवरात्रोत्सव निमित्ताने विविध कार्यक्रम.

प्रकाशन: 01 Oct 2024 04:21 PM
वाचन संख्या 74

मळगांव | नितिन गावडे : नवरात्रोत्सव निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील म्हापण गावातील उत्साही मिञमंडळाकडून दुर्गापूजनासह म्हापण – पाट बाजारपेठ पिंपळपार येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये गुरुवार दिनांक ३ ऑक्टोबर रोजी दुर्गामाता पूजन, आरती, तिर्थप्रसाद, ग्रामस्थांची भजने, दांडीया व गरबा यांचे आयोजन करण्यात आले आहे, तसेच ी ४ ऑक्टोबर रोजी रात्री ९:३० वाजता नाईक मोचेमाडकर पारंपरिक दशावतारी लोक नाट्य मंडळ यांचा नाट्य प्रयोग होणार आहे. शनिवार ५ ऑक्टोबर रोजी नटराज प्रोडक्शन प्रस्तुत तुळशीदास दिग्दर्शीत विश्वकला मंच सावंतवाडी निर्मित कलाविष्कार, नृत्य, डान्स , विनोदांचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. रविवार ६ ऑक्टोबर रोजी खुल्या व ग्रामीण रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार ७ ऑक्टोबर रोजी बाबा मेस्त्री गृप नेरुर निर्मित ‘कोकणचो शिमगो’ मध्ये विविध चलचित्रे व हालते देखावे याचे सादरीकरण केले जाणार आहे.
मंगळवार ८ ऑक्टोबर रोजी खुल्या दांडीया स्पर्धा आयोजन तसेच बुधवार ९ ऑक्टोबर रोजी अग्गंबाई सुनबाई हे दोन अंकी मराठी रहस्यमय विनोदी नाटक ठेवण्यात आले आहे. गुरुवार १० ऑक्टोबर रोजी भजनप्रेमींसाठी डबलबारीचा जंगी सामना, ११ ऑक्टोबर रोजी चिमणी पाखर डान्स ॲकॅडमी कुडाळ आयोजित जलवा २०२४ कलाविष्काराचे आयोजन करण्यात आले आहे.

विजयादशमी निमित्ताने श्री सत्यनारायण महापुजा व महाप्रसाद ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन उत्साही मित्रमंडळाकडून करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स