अभिनेते गोविंदा बंदुकीच्या मिसफायर गोळीने जखमी..!
मुंबई | ब्युरो न्यूज : भालतिय अभिनेते गोविंदाच्या पायाला गोळी लागली आहे. गोविंदाकडे परवानाधारक रिव्हॉल्व्हर आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना आज१ ऑक्टोबरला पहाटे पाचच्या सुमारास घडली आहे. गोविंदा पहाटे घराबाहेर जाण्यासाठी निघाले असताना हा प्रकार घडला. पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. गोविंदाची बंदूक जप्त करण्यात आली असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
गोळी लागल्यानंतर गोविंदाच्या पायातून खूप रक्त वाहत होते. गोविंदाची प्रकृती सध्या कशी आहे याबाबत अद्याप कोणतीही सखोल माहिती समोर आलेली नाही.
घराबाहेर पडण्यापूर्वी गोविंदा आपली बंदुक साफ करत होता. त्यावेळी याच्याकडू मिसफायर झाल्याने त्याच्या पायाला गोळी लागली आहे. अनावधानाने खटका दाबला गेल्याने बंदुकीतून गोळी सुटली व ती त्याच्या पायाला लागली. यानंतर जखमी झालेल्या गोविंदाला जवळच्या क्रिटी केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
गोविंदाचे व्यवस्थापक शशी सिन्हा यांनी एएनआयला सांगितले की, अभिनेता आणि नेता गोविंदा कोलकाता येथे जाण्याच्या तयारीत होते. त्यापूर्वी तो आपले परवाना असलेले रिव्हॉल्व्हर साफ करत असताना त्यातून चुकून गोळी झाडली गेली आणि त्यांच्या पायाला लागली. डॉक्टरांनी गोळी काढली असून त्यांची प्रकृती ठीक आहे. ते आता रुग्णालयात आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)