ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
तुमच्या हक्काचं तुम्हाला मिळवून देणे हा जाणीव जागर यात्रेचा आमचा उद्देश : सौ. अर्चना घारे - परब.

तुमच्या हक्काचं तुम्हाला मिळवून देणे हा जाणीव जागर यात्रेचा आमचा उद्देश : सौ. अर्चना घारे - परब.

प्रकाशन: 01 Oct 2024 01:55 PM
वाचन संख्या 83

जाणीव जागर यात्रेला रोणापालमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद.

बांदा | राकेश परब : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून जाणीव जागर यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला सावंतवाडी तालुक्यातील रोणापाल गावात जाणीव जागर यात्रा पोहचली. ग्रामस्थांनी यात्रेमधील सहभागी कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे – परब यांचे स्वागत केले. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रोणापाल गावात यात्रेला मिळाला. यावेळी रोणापाल गावचे माजी सरपंच प्रकाश गावडे, ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर नेमण, अशोक कुबल, सुदिन गावडे, उमेश तुयेकर, संतोष कोळापटे, बाबल तुयेकर, सचिन कुबल, निलेश नाईक,प्रदिप नाईक उपस्थित होते.

यावेळी या यात्रेमध्ये बोलताना कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चनाताई घारे-परब म्हणाल्या आमच्या मुलभूत हक्कापासून वंचित ठेवण्याच काम गेली अनेक वर्षे झालेल आहे. त्यामुळे आमच्या जे हक्काचं आहे ते आम्हाला प्राप्त झाले पाहिजे असे प्रतिपादन कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे – परब यांनी जाणीव जागर यात्रेवेळी मार्गदर्शन करताना केले.

सावंतवाडी तालुक्यातील रोणापाल गावातील महिला, युवक, ज्येष्ठांकडून यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी ग्रामस्थांनी आरोग्य, रोजगार, याबाबत व्यथा मांडल्या‌. महिला वर्गाने देखील मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती. यावेळी महिलांनी आपल्या समस्या सौ. अर्चना घारे-परब यांच्यासमोर मांडला. यावेळी सौ. घारे यांनी, उपस्थितांना मूलभूत हक्कांची जाणीव करून दिली. असंख्य समस्या आपल्यापुढे आहेत. आपल्याला हक्काच्या या गोष्टींपासून वंचित राहावे लागत आहे. हे सगळे आपले मुलभूत हक्क असून हक्काच आहे ते प्राप्त झालेच पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही ही आपल्याला दिलेली शक्ती असून त्यात मोठी ताकद आहे. त्या शक्तीची, त्या ताकदीची जाण ठेवा, ती ताकद स्मरणात ठेवा. तुमच्या हक्काचं तुम्हाला प्राप्त करून देणे हाच आपला उद्देश आहे असे प्रतिपादन सौ. अर्चना घारे यांनी यावेळी केले. याप्रसंगी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार सावंतवाडी तालुकाध्यक्ष श्री. पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष श्री. देवेंद्र टेमकर, युवती महीला जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, सावंतवाडी विधानसभा युवती अध्यक्षा सौ.सुनिता भाईप, सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष श्री. संजय भाईप,विधानसभा युवक अध्यक्ष विवेक गवस, विद्यार्थी अध्यक्ष कु. हृतिक परब, जुहुर खान, याकूब शेख, सिद्धेश तेंडोलकर, बावतीस फर्नांडिस, साईनाथ तानावडे, संजय तानावडे, राजन परब, नामदेव परब, आनंद गावडे, साईनाथ गावडे, तेजस गांवकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते यात्रेला उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 301

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स