ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
आकेरीतील अपघातात उदयोन्मुख व्हेटर्नरी डाॅक्टरचे निधन.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

आकेरीतील अपघातात उदयोन्मुख व्हेटर्नरी डाॅक्टरचे निधन.

प्रकाशन: 29 Sep 2024 11:57 PM
वाचन संख्या 251

कुडाळ | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आकेरी घाटात शनिवारी रात्री मोटार सायकल घसरून झालेल्या अपघातात पिंगुळी – आंबेडकरनगर येथील किशन केशव पिंगुळकर (वय २१ वर्षे) या यवकाचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे बसलेले श्रीराम पांडुरंग केळुसकर हा जखमी झाला. दिवंगत युवक किशन पिंगुळकर याला गोवा बांबुळी येथे हलविण्यासाठी कार्डियाक ऍम्ब्युलन्सची गरज असताताना एकही ऍम्ब्युलन्स उपलब्ध झाली नाही. त्यामुळे नुकताच व्हेटर्नरी डॉक्टर झालेल्या या नवयुवकाला प्राण गमवावे लागले. याबद्दल जिल्ह्यातील सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे.

अपघाताबाबत कुडाळ पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार आकेरी येथे जुनी कोका कोला कंपनी समोरच्या रस्त्यावर उताराच्या ठिकाणी हा अपघात रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमाराला घडला. दिवंगत किशन केशव पिंगुळकर हा आपला शेजारी श्रीराम पांडुरंग केळुस्कर यांच्यासह कोलगाव-सावंतवाडी येथून त्याच्या मोटारसायकलने (क्र. MH-O7-AE- http://localhost/news/public/uploads/2019) पिंगुळीला आपल्या घरी जात असताना. आकेरी घाटात त्याची मोटारसायकल स्लिप होऊन मोटार सायकलवरील दोघेही रस्त्यावर फेकले गेले. अत्यवस्थ असलेल्या किशनला आणि जखमी झालेल्या श्रीराम याना सावंतवाडी येथीलरुग्णालयात हलविण्यात आले. पण किशन खूप अत्यवस्थ असल्याने त्याला पुढील उपचारासाठी बांबोळी येथे हलवायचे होते. त्यासाठी कार्डियाक ऍम्ब्युलन्सची गरज होती. पण जिल्हयातील दोन्ही कार्डियाक ऍम्ब्युलन्स उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे पहाटे चार वाजता किशन केशव पिंगुळकर याची प्राणज्योत मालवली.

या अपघाताची खबर पिंगुळी येथील देवेंद्र पिंगुळकर यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. या प्रकरणी मोटार सायकल चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उप निरीक्षक रवींद्र भांड अधिक तपस करत आहेत.

दरम्यान किशन हा नुकताच व्हेटर्नरी डॉक्टर झाला होता. पिंगुळी येथे शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई- वडील, भाऊ-बहीण, काका-काकू असा परिवार आहे. किशन हा पिंगुळी ग्रामपंचायत सदस्य केशव उर्फ बंड्या पिंगुळकर यांचे सुपुत्र होत. डाॅ. किशनच्या अपघाती मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स