ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बांदा येथे युवा नेते श्री. शैलेश लाड यांच्या कडून वाढदिवसा निमित्त नट वाचनालयाला आर्थिक देणगी.

बांदा येथे युवा नेते श्री. शैलेश लाड यांच्या कडून वाढदिवसा निमित्त नट वाचनालयाला आर्थिक देणगी.

प्रकाशन: 20 Sep 2024 09:17 PM
वाचन संख्या 63

बांदा | राकेश परब : राष्ट्रवादी काँग्रेसचे सावंतवाडी विधानसभा युवक अध्यक्ष तथा येथील सामाजिक कार्यकर्ते शैलेश लाड यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील नट वाचनालयाला स्पर्धात्मक शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी दहा हजार रुपयांची देणगी दिली.

यावेळी वाचनालयाच्या सभागृहात श्री लाड यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष निलेश मोरजकर, सचिव राकेश केसरकर, ग्रंथपाल सुस्मिता नाईक, सहाय्यक ग्रंथपाल सुनील नातू, विमा प्रतिनिधी संदीप नार्वेकर, प्रशांत गवस, सत्यवान काळसेकर, ओंकार राऊळ आदी उपस्थित होते.
  
यावेळी श्री लाड यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. श्री लाड यांना वाचनालयाचे आजीव सभासद करून घेण्यात आले. यावेळी त्यांनी शैक्षणिक स्पर्धात्मक उपक्रमांसाठी दहा हजार रुपयांची देणगी दिली. या देणगीतून मुलांसाठी शालेय स्तरावर चित्रकला व रंगभरण स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे सचिव राकेश केसरकर यांनी सांगितले. आभार निलेश मोरजकर यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 295

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स