ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचार थांबत नाही तोपर्यंत भारत - बांगलादेश क्रिकेट सामने रद्द करायची बीसीसीआय कडे मागणी.

बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचार थांबत नाही तोपर्यंत भारत - बांगलादेश क्रिकेट सामने रद्द करायची बीसीसीआय कडे मागणी.

प्रकाशन: 16 Sep 2024 06:27 PM
वाचन संख्या 138

मुंबई | ब्युरो न्यूज : बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार चालू असतांना बांगलादेश आणि भारत यांच्यात क्रिकेटचे सामने आयोजित करणे हा हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळण्याचा संतापजनक प्रकार आहे. जोपर्यंत बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबत नाहीत, तोपर्यंत भारत – बांगलादेश यांच्यातील सर्व क्रिकेट सामने आणि बांगलादेशी कलाकारांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात यावेत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने ‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळा’कडे (BCCI) केली आहे. याविषयीचे निवेदन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने ‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळ’ (BCCI) येथील विशेष कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले, या वेळी हिंदू जनजागृती समितीचे अधिवक्ता अनीश परळकर, मानव सेवा प्रतिष्ठानचे विनायक शिंदे, धर्मप्रेमी अधिवक्ता राहुल पाटकर, रविंद्र दासारी, संदीप तुळसकर हे उपस्थित होते. या निवेदनाची प्रत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय क्रीडामंत्री आणि परराष्ट्रमंत्री यांनाही देण्यात आली आहे अशी माहिती हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता रमेश शिंदे यांनी दिली आहे.

या वेळी सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बांगलादेशसोबत भारताचे क्रिकेटचे दोन कसोटी सामने आणि तीन टी-२० सामने १९ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत भारतात आयोजित करण्यात आले आहेत. हे क्रिकेट सामने चेन्नई, कानपूर, ग्वालियर, दिल्ली आणि हैदराबाद येथे होणार आहे. दुसरीकडे बांगलादेशातील हिंदू समाजावर सातत्याने हल्ले चालू आहेत. आतापर्यंत २३० लोकांचा मृत्यू झाला असून, बांगलादेशातील ६४ जिल्ह्यांपैकी ५२ जिल्ह्यांमध्ये हिंदूविरोधी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. शेख हसीना सरकारच्या राजीनाम्यानंतर हिंदूंच्या विरोधातील हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. विशेषत: ग्रामीण भागात हिंसाचार अधिक आहे, जिथे हिंदू समुदाय असुरक्षिततेच्या वातावरणात जीवन जगत आहे. नुकतीच उत्सव मंडल या तरुण हिंदु युवकाचे कथित ईशनिंदेच्या आरोपाखाली जिहादी जमावाने थेट पोलीस ठाण्यात घुसून त्या युवकाचे दोन्ही डोळे काढून चिरडले. अशा प्रकारे बांगलादेशात हिंदूंवरील आक्रमणे करणे, त्यांच्या निर्घृण हत्या करणे हे राजरोसपणे चालू आहे.

मुसलमान समाजावर होणार्‍या कोणत्याही आघाताला इतर मुसलमान देश तीव्र विरोध करतात, तशीच भूमिका भारताने हिंदूंवरील हल्ल्यांच्या विरोधात घ्यावी. बांगलादेशात तेथील धर्मांध जिहादी हिंदूंच्या राजरोसपणे हत्या करणार, हिंदूंची घरे जाळणार, हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करणार, भूमी बळकावणार, हिंदू महिलांवर बलात्कार करणार आणि आम्ही त्यांच्यासोबत क्रिकेटचे सामने खेळायचे का ? हे आम्ही कदापी सहन करणार नाही, असे समितीने पत्रकात म्हटले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स