ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
गावराईत आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत अनेक भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे  पक्षात प्रवेश...!

गावराईत आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत अनेक भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश...!

प्रकाशन: 12 Sep 2024 07:26 AM
वाचन संख्या 76

कुडाळ | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील गावराई येथील असंख्य भाजप व राणे समर्थक कार्यकर्ते यांनी काल, आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर यांच्यावर विश्वास ठेवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला. आमदार वैभव नाईक यांनी विविध योजनांमधून लाखो रुपयांचा विकास निधी देऊन या भागातील ग्रामस्थांची विकास कामे मार्गी लावली आहेत. तसेच पुढील येणाऱ्या काळात राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येऊन आमदार नाईक हे पालकमंत्री असतील व विकास कामे अजून जोमाने होतील असा विश्वास प्रवेशकर्त्यांनी व्यक्त केला. भाजाप कार्यकर्ते मंगेश फाले व बाळा वालावलकर यांच्या नेतृत्वाखाली आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत आज हा पक्षप्रवेश झाला.

या प्रवेशा दरम्यान रमेश दादू फाले,नंदू नाऊ खरात ,विठ्ठल जनार्दन काळे ,गणेश राया फाले, धाकू रामा फाले, अनंत सीताराम काळे, प्रकाश देवू फाले, चांगु बाबुराव फाले,सखाराम भगवान फाले, सुनील जनार्दन फाले, सतीश नाऊ फाले, बाबी धाकू जंगले, लक्ष्मण भगवान कोकरे, लक्ष्मण सखाराम फाले, अजित धाकू जंगले, संदीप सीताराम काळे, अनिकेत रमेश फाले, अमर रामा फाले, दिनेश धाकू फाले, सचिन सीताराम फाले, निलेश मंगेश फाले, दीपक विठ्ठल खरात, सुजल संतोष खरात, रोहित मंगेश कोकरे, संजय सखाराम काळे, रमेश चोंदू फाले, भगवान धोंडू फाले, संतोष केदू फाले, जाणू रामा फाले, महेश भगवान फाले, बालकृष्ण भगवान फाले, गोविंद भगवान फाले, संतोष मुरारी काळे, संतोष बाबी जंगले, ठकू जाणू फाले, संतोष नाऊ फाले, लक्ष्मण बाबू काळे, संतोष नाऊ खरात, शतांष खरात यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.

याप्रसंगी जिल्हा प्रमुख संजय पडते, शिवेसना जिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुका संघटक बबन बोभाटे, विभाग प्रमुख नागेश ओरोसकर, अवधूत मालंडकर, छोटू पारकर उपसरपंच संतोष सामंत, महेश परुळेकर, प्रकाश वालावलकर, कृष्णा गावडे, रमेश वाळेकर हरी वायंगणकर, सरिता जंगले, सानिका सामंत आदि शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स