सावंतवाडी तालुक्यातील चिरेखाणीवर महसूल खात्याचे अंकुश आहे का ; महेश परब यांचा सवाल.
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या मळेवाड येथील चिरेखाणी मध्ये लहान मुलीचा झालेला अपघात हे याच धडधडीत उदाहरणं आहे. त्या मुलीचा अपघातात मृत्यू होऊन पंधरा दिवसा नंतर तिचा मृत देह प्रशासनाने बाहेर काढला. हा अपघात होता की घातपात असा प्रश्न पडतो. कारण एका मुलीचा अपघातामध्ये मृत्यू होतो आणि त्या मृतदेहाची कोणाला कानोकान खबर न लागता त्याची विल्हेवाट लावली जाते आणि प्रशासनाने तो मृत देह बाहेर काढल्या नंतर प्रशासनाने संबंधित आरोपीना अटक केली. परंतु झाले काय एवढा मोठा गुन्हा करून दुसऱ्या दिवशी ते आरोपी जमिनावर बाहेर पडतात. या मागे नक्की कोणाचा हात आहे हा मोठा प्रश्न आहे. हे सगळं बघितल्या नंतर असा संशय येतो की अजून किती मृत देह या चिरेखाणींमध्ये दफन असतील.असे मत आपल्या प्रसिध्दी पत्रकाद्वारे सावंतवाडी विधानसभा संपर्क अध्यक्ष महेश परब यांनी दिले आहे.
एवढा मोठा अपघात त्यात एका मुलीचा मृत्यू होतो आणि मृत देहाची परस्पर विल्हेवाट लावली जाते. या चिरेखाण मालकांवर कोणाचा वरदहस्त आहे. या चिरेखाणी बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वारंवार तक्रार करून ही प्रशासन लक्ष देत नाही. महसूल खाते आणि प्रशासनाने लवकरात लवकर सावंतवाडी तालुक्यातील अनधिकृत चिरेखाणी वर कारवाई करावी तसेच ज्या चिरेखाणी अधिकृत आहेत पण एका पास वर तीन ते चार फेरे मारून शासनाचा महसूल बुडवत आहेत त्यांच्या वरही कारवाई करावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावंतवाडी विधानसभा संपर्क अध्यक्ष महेश परब महसूल खाते आणि प्रशासना विरोधात प्रखर आंदोलन उभारणार असल्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)