ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
ओझर विद्या मंदिर येथे अद्ययावत संगणक कक्षाचे उद्घाटन.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

ओझर विद्या मंदिर येथे अद्ययावत संगणक कक्षाचे उद्घाटन.

प्रकाशन: 09 Sep 2024 12:25 PM
वाचन संख्या 60

मसुरे | प्रतिनिधी : मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती मुंबई संचालित, ओझर विद्यामंदिर कांदळगाव, तालुका मालवण या प्रशालेमध्ये नव्यानेच तयार करण्यात आलेल्या अद्ययावत संगणक कक्षाचे उद्घाटन, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा ओझर विद्या मंदिरचे माजी विद्यार्थी डॉ. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

शाळेतील विद्यार्थी, पालक त्याचप्रमाणे शिक्षकांनी शाळेत ऑनलाइन संगणक शिक्षण सुरू करण्याबाबत प्रयत्न करण्याची संस्थेकडे मागणी करण्यात आलेली होती. त्याचप्रमाणे माजी विद्यार्थी आणि मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा.डॉ. सुहास पेडणेकर यांच्याकडे सुद्धा शाळेतील सर्व शिक्षकांनी, मुलांना ऑनलाइन संगणक शिक्षण सुरु करण्याची विनंती केली होती. त्यानुसार माजी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी अल्पावधीतच मुंबई येथील रोटरी क्लब, मुलुंड यांच्यावतीने पाच नवीन संगणक व मुंबई येथील त्यांचे मित्र श्री. मुकेश केनिया यांच्याकडून पाच नविन संगणक संच असे एकूण दहा संगणक संच उपलब्ध करून दिले. हे संगणक संच सुस्थितीत राहण्यासाठी नवीन संगणक कक्षाची उभारणी श्रीमती नीलम अनिल शेलटकर यांच्या सौजन्याने शालेय समितीचे सदस्य श्री. विजय शेलटकर यांच्या प्रयत्नाने करण्यात आली. नवीन संगणक संच व नवीन कक्ष यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट अशा प्रकारचे ऑनलाइन संगणक शिक्षण मिळणार आहे. सदर सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. सुहास पेडणेकर, श्रीमती नीलम अनिल शेलटकर त्याचप्रमाणे श्री. विजय शेलटकर यांचे ओझर विद्यामंदिर परिवारातर्फे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे माजी विद्यार्थी तथा सिंधुदुर्ग जिल्हा समाज कल्याण विभागाचे माजी सहाय्यक आयुक्त श्री शामसुंदर पेडणेकर, माजी विद्यार्थी श्री मंगेश वायंगणकर, सुरेश भोजने शालेय समिती अध्यक्ष, श्री. किशोर नरे, सदस्य श्री. विजय शेलटकर श्री विजय कांबळी, श्री जयराम कांबळी, श्री. विशाल राणे,शाळेचे मुख्याध्यापक श्री. डी. डी. जाधव, सहा. शिक्षक श्री अभय शेर्लेकर श्री एन एस परुळेकर, श्री शिवराम सावंत, श्रीमती पवार मॅडम, सर्व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी, पालक,माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा.शिक्षक श्री प्रवीण पारकर यांनी,तर आभार प्रदर्शन सहा.शिक्षक श्री पी. के. राणे यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स