ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
सातारा मॅरॅथॉन स्पर्धेत रांगणा रनर्सची चमकदार कामगिरी.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

सातारा मॅरॅथॉन स्पर्धेत रांगणा रनर्सची चमकदार कामगिरी.

प्रकाशन: 09 Sep 2024 12:14 PM
वाचन संख्या 43

मसुरे | प्रतिनिधी : सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेत रांगणा रनर्सच्या सदस्यांनी चमकदार कामगिरी केली. अतिशय अवघड अशा या स्पर्धेत देश विदेशातून हजारो स्पर्धक सहभाग घेतात. यावर्षी एकूण ८ हजार स्पर्धकांनी भाग घेतला होता. यशस्वी स्पर्धकांना तीन विभागात मेडल देण्यात येतात. स्पर्धा दोन तासात पूर्ण केली तर सुवर्ण, अडीज तासात पूर्ण केली तर रजत व नंतर पूर्ण करणाऱ्यांना रौप्य पदक देण्यात येते. पाच वर्ष भाग घेतला तर डबल मेडल देण्यात येते.

या स्पर्धेसाठी दरवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रांगणा रन्नर्स हा डॉक्टरांचा गृप सहभाग घेतो. त्यात काही नॉन मेडिको ही मित्र सोबत जातात. यावर्षी ८ जणांनी स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. या स्पर्धेची तयारी म्हणून रनिंग मधील वेगवेगळ्या पद्धतीचा तीन महिने सराव करावा लागतो. सुरुवातीपासून पूर्ण साडेदहा किलोमीटर पर्यंत घाट रस्ता असल्यामुळे स्पर्धकांचा खरा कस लागतो. पूर्ण सातारा शहरातील नागरिक लहान थोर मंडळी रनर ना प्रेरणा देण्यासाठी दोन्ही बाजूने टाळ्या वाजवून स्वागत करत असतात. मार्गावर ढोल ताशांची पथके रन्नर्स चा जोश वाढवत असतात. स्वागत करत असतात. या स्पर्धेत डॉ प्रफुल आंबेरकर (2.58), डॉ. सोमनाथ परब (2.44), डॉ रोहन कोरगावकर (2.06), डॉ संचित खटावकर (2.12), डॉ. रवी बुरुड (2.58), डॉ. गुरुप्रसाद सौदत्ती (3.51), डॉ गौरी परुळेकर (3.33), प्रशांत माळकर (2.54) यांनी ही रन यशस्वीरित्या पूर्ण केली. डॉ सोमनाथ परब यांनी यावेळी पाच वेळा ही स्पर्धा पूर्ण केल्यामुळे त्यांना डबल मेडल प्राप्त झाले. रांगणा रनर्स, रांगणा रागिणी, ब्युटीज ऑन व्हील चे सर्व सदस्य व इतर मित्र परिवाराने त्या सर्व रनर्स चे अभिनंदन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स