ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
गणेश मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांना बिएमडब्ल्यू कारने उडवलं ; एक ठार तर एकाची प्रकृती गंभीर.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

गणेश मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांना बिएमडब्ल्यू कारने उडवलं ; एक ठार तर एकाची प्रकृती गंभीर.

प्रकाशन: 07 Sep 2024 08:57 AM
वाचन संख्या 305

चालक फरार…!

मुंबई | ब्युरो न्यूज : ऐन गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मुंबईत एक ह्रदयद्रावक घडली आहे. मुलुंडमध्ये पहाटे ४ वाजता एका बीएमडबल्यू कारने रस्त्यावर बॅनर लावणाऱ्या गणेश मंडळाच्या दोन कार्यकर्त्यांना जोरदार धडक दिली. त्यानंतर चालकाने तिथून पोबारा केल्याचे वृत्त आहे. यात एक कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला असून दुसऱ्याची परिस्थिती गंभीर आहे.

मुलुंडचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेश मंडळाच्या मंडपाजवळ प्रीतम थोरात आणि प्रसाद पाटील हे कार्यकर्ते पहाटे चार वाजताच्या दरम्यान मुलुंडच्या गव्हाणपाडा येथील आकृती टॉवर जवळ बॅनर लावत होते. अचानक भरधाव वेगात एक बीएमडब्लू कार कँपस हॉटेल कडून मुलुंड पूर्व ते वेस्टच्या ब्रिजकडे जात असताना या दोघांना जोरदार धडक दिली. धडक देऊन हा चालक थांबला नाही, मुलुंड पश्चिमेकडे भरधाव वेगाने तो पळून गेला. यात प्रीतम थोरात याचा मृत्यू झालं असून प्रसाद पाटीलची प्रकृती गंभीर आहे, स्थळी पोलीस दाखल झाले असून कारचा आणि चालकाचा शोध सुरू आहे.

फोटो सौजन्य | मुंबई ब्युरो

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स