व्हिक्टर डांटस लॉ कॉलेज चे 57व्या महोत्सवाच्या अंतिम फेरीत पहिल्याच दिवशी रौप्य पदक मिळवत यशाची आरोळी
सिंधुदुर्ग |
मुंबई विद्यापीठाअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या आंतर महाविद्यालयीन 57 व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत पहिल्याच दिवशी व्हिक्टर डांटस लॉ कॉलेज, ने वक्तृत्व मराठी या इव्हेंट मध्ये रौप्य पदक मिळवून यशाची आरोळी दिलेली आहे…या वर्षी च्या युवा महोत्सवाचा झोनल राऊंड भोसले कॉलेज ऑफ फार्मसी येथे पार पडला होता ज्यात एकूण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 40 महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला होता. व्हिक्टर डांटस लॉ कॉलेज चे 6 इव्हेंट मुंबई येथे होणाऱ्या अंतिम फेरी साठी पात्र ठरले असून वक्तृत्व मराठी या इव्हेंट मध्ये डांटस लॉ कॉलेज चा विध्यार्थी कु. पृथ्वीराज एकले याने वक्तृत्व या इव्हेंट मध्ये रौप्य पदक मिळवत आपले व महाविद्यालयाचे नाव उज्वल केले आहे. तसेच होणाऱ्या पुढील इव्हेंट मध्ये सुद्धा लवकरच अधिक पदके आणू असे आश्वासन लॉ कॉलेज चे प्रा. संग्राम गावडे सर यांनी दिले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)