मालवण येथे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील १ सप्टेंबर रोजी येणार
मालवण राजकोट येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर १ सप्टेंबर रोजी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे मालवण येथे येणार आहेत, अशी माहिती मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अँड. सुहास सावंत यांनी दिली. दरम्यान मालवण राजकोट किल्ल्यावर झालेला प्रकार हा राज्याला काळिमा फासणारा आहे असा आरोप करून शंभर फुटी पुतळा उभारण्याची तुमची पात्रता नाही आम्ही लोक वर्गणीतून तो नक्कीच उभारू असे त्यांनी सांगितले.
मराठा महासंघाच्या माध्यमातून राजकोट येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी सकाळी ११ वाजता सावंतवाडीच्या तहसीलदाराला निवेदन देण्यात येणार आहे तत्पूर्वी सावंतवाडी येथील राजवाडा येथे निषेध करून त्यानंतर सावंतवाडी तहसीलदार यांना लेखी निवेदन सादर करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर काल येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली. या पत्रकार परिषदेत अभिषेक सावंत पुंडलिक दळवी मनोज घाटकर संजय लाड प्रसाद राऊळ आनंद गवस नंदू विचारे शिवा गावडे श्रीपाद सावंत राजे प्रतिष्ठानचे खजिनदार ज्ञानेश्वर पारधी आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)