ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मुंबई शूटिंगबॉल असो. ची कार्यकारिणी जाहीर!

मुंबई शूटिंगबॉल असो. ची कार्यकारिणी जाहीर!

प्रकाशन: 25 Aug 2024 04:14 PM
वाचन संख्या 67

अध्यक्षपदी शामभाई सावंत,सरचिटणीसपदी दीपक सावंत यांची निवड

मसुरे |

मुंबई शूटिंगबॉल असो.ची त्रैवार्षिक (२०२४-२७) कार्यकारिणी निवडण्यात आली असून अध्यक्षपदी माजी आमदार शामभाई सावंत तर सरचिटणीसपदी मसुरे गावचे सुपुत्र दीपक सावंत यांची निवड करण्यात आली. शूटिंगबॉल फेडरेशन ऑफ इंडिया या राष्ट्रीय संघटनेशी संलग्न असलेल्या, तसेच मुंबईला राज्याचा दर्जा असलेल्या मुंबई शूटिंगबॉल (व्हॉलीबॉल) असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा २३ ऑगस्ट् २०२४ रोजी पराग विद्यालय, भांडुप येथे विद्यमान अध्यक्ष माजी आमदार श्री श्यामभाई सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सदर सभेत त्रैवार्षिक (२०२४-२७) नवीन कार्यकारिणीची निवड बहुमताने करण्यात आली. नवनियुक्त कार्यकारणी पुढील प्रमाणे आहे. अध्यक्ष शामभाई सावंत, सरचिटणीसदीपक कृ सावंत,खजिनदार प्रफुल्लकांत वाईरकर,कार्याध्यक्ष जालंदर चकोर, उपाध्यक्ष मंगेश भोसले, रत्नदीप रावराणे,सहसचिव मिलिंद बिर्जे, प्रदीप वाघ,सदस्य श्रीकांत वाईरकर, महेश कदम दिलीप मालंडकर,सल्लागार : अशोक चव्हाण, पांडुरंग सुतारमुंबई व उपनगरात विभागवार राज्यस्तरीय स्पर्धा आयोजन करून क्रीडा युवकांना या खेळाकडे आकर्षित करण्याचा आमचा प्रयत्न असेल.

व्यावसायिक, शासकीय संघ नोंदणीकृत करून खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अशा कंपन्याना विनंती करून संघनोंदणी करून घेतली जाईल. तसेच शालेय पातळीवर अधिकाधिक विद्यार्थ्यांना हा खेळ शिकविण्यासाठी ज्येष्ठ खेळाडू यांना त्या विभागीय शाळांमधे पाठविण्याचा प्रयोग करायला प्राधान्य देण्यात येईल. शालेय क्रीडापटूंना विशेष नैपुण्य गुण मिळण्यासाठी आमचा सर्वतोपरी प्रयत्न असेल. मुंबईने राज्याला राष्ट्राला या खेळात खूप खेळाडू दिले, तेच गत वैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न असतील.क्रीडा प्रोत्साहना साठी एक नवीन प्रयोग म्हणून महिन्यातून दोन वेळा चार – सहा संघ निमंत्रित करून मिनी सराव स्पर्धा घेण्यात येईल. मुंबई नोंदणीकृत खेळाडूंना अपघाती विमा संरक्षण मिळवण्याचे प्रयास सुरू आहेत.यावर्षी राष्ट्रीय मिल मजदुर संघ पुरस्कृत वार्षिक कामगार महर्षी स्व गं. द. आंबेकर स्मृती चषक, निवड चाचणी- मुंबई मर्यादित सचिव चषक, अखिल भारतीय अध्यक्षीय चषक तसेच मुंबई असोसिएशनच्या सहकार्याने, कोंकणातील मसुरे या क्रीडाप्रेमी गावात स्व. बाजीराव राणे स्मृती चषक या एका अखिल भारतीय भव्य स्पर्धेचे आयोजन या क्रीडावर्षात करण्यात येईल अशी माहिती सरचिटणीस दीपक सावंत यांनी दिली .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 279

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स