ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
ओझर बांदिवडे, चौके मसुरे, कसाल मालवण रस्ता साईडपट्टी साफसफाई व खड्डे भरण्यास प्रारंभ!

ओझर बांदिवडे, चौके मसुरे, कसाल मालवण रस्ता साईडपट्टी साफसफाई व खड्डे भरण्यास प्रारंभ!

प्रकाशन: 25 Aug 2024 01:50 PM
वाचन संख्या 102

मसुरे |

कोकणवासियांचा लाडका सण म्हणजे गणेशोत्सव. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रस्ता लगतची झाडी तोडणे व साफसफाई करणे, व रस्ता खड्डे भरणे कामाला प्राधान्य देण्यात येत आहे.

मालवण तालुक्यातील ओझर कांदळगाव मसुरे बांदिवडे रस्ता, चौके आंबडोस माळगाव मसुरे रस्ता, मालवण कसाल रस्ता या रस्त्यांलगतची साइडपट्टी वरील झाडी तोडून तसेच रस्त्यास पडलेले खड्डे भरून रस्ते वाहतुकीस सुस्थितीत करण्याच्या कामाचा प्रारंभ झाला असून बहूतांश काम पूर्ण झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, उप अभियंता अजित पाटील, शाखा अभियंता तुषार येरंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर काम पूर्ण झाले आहे. ग्रामस्थांसह वाहन चालकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे यासाठी आभार मानले आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स