ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
युवतीसेना प्रमुख अधिकारी सौ. शिल्पा यतीन खोत यांनी वेधले शिक्षणमंत्र्यांचे लक्ष..!

युवतीसेना प्रमुख अधिकारी सौ. शिल्पा यतीन खोत यांनी वेधले शिक्षणमंत्र्यांचे लक्ष..!

प्रकाशन: 23 Aug 2024 12:35 PM
वाचन संख्या 164

पाल्य, पालक आणि दैनंदिन जीवनाच्या वेळापत्रकावर होतोय परीणाम ; इंग्रजी माध्यम प्रशालांची बदललेल्या वेळेचा मुद्दा.

मालवण | सुयोग पंडित : इंग्रजी माध्यमांच्या प्रशालांची बदललेली वेळ हा सध्या पाल्य, पालक आणि दैनंदिन जीवनाच्या एकंदर वेळापत्रकावर परीणाम करतोय असा सूर आहे. त्याचा पाल्य तथा विद्यार्थी विद्यार्थीनींच्या मानसीक स्थितीवरही परीणाम होतो कुजबंज सुद्धा सामान्य पालक वर्गात होत होती. दोन दिवसांपूर्वी सावंतवाडी येथील एका प्रशालेच्या पालक वर्गाने शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिले होते. परंतु जिल्ह्यातील इतर ठिकाणहून सुद्धा आता या बदललेल्या वेळेविषयी शिक्षणमंत्र्यांचे लक्ष वेधण्यास आरंभ झाला आहे.

कुडाळ मालवण युवतीसेना प्रमुख अधिका तथा मालवणच्या समाजसेविका सौ शिल्पा यतीन खोत यांनी यासंदर्भात प्रसार माध्यमांच्या द्वारा शिक्षणमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. इंग्रजी शाळेची वेळ बदलण्यात आल्यामुळे ग्रामीण भागातून सकाळी ८ वाजता बाहेर पडणाऱ्या मुलांना शाळा आटोपून घरी पोहचण्यास सायंकाळी ४ ते ४.३० वाजतात. मुलांनी सकाळी डब्यातून आणलेले जेवण दुपारपर्यंत थंड होत असल्याने मुलांचा आहार, विश्रांती वगैरे सगळं गडबडून जातं असं सौ. शिल्पा यतीन खोत यांनी स्पष्ट केले आहे.

जेवणाची वेळ बदलल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. काही लांब राहणाऱ्या पालकांना व नोकरदार पालकांना मुलांची ने- आण करताना धावपळ होत आहे. तसेच बदललेल्या वेळेमुळे मुलांना इतर स्पर्धा परीक्षांचे वर्ग, नृत्य, कराटे वगैरे प्रशिक्षणाला जाताना ओढताण होत आहे. मालवणात बाहेरुन येणारी मुलेही आहेत. या सर्व अडचणी लक्षात घेऊन शाळेची वेळ बदलून सकाळी ९ ते दुपारी १.३० किंवा ९ ते दुपारी २ करावी, मागणी पालकांनी शिक्षणमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. बदलत्या काळात बहुतांश पालकांचे व्यवसाय सुद्धा हंगामी आहेत व त्यानुसार बदललेली वेळ खूप गैरसोयीची आहे असे सौ. शिल्पा यतीन खोत यांनी परखडपणे सांगितले आहे.

मालवणमधील इंग्लिश प्रशालांच्या पालकांच्या मतांचा अभ्यास करुन युवतीसेना प्रमुख अधिकारी सौ शिल्पा यतीन खोत यांनी यासंदर्भात शिक्षणमंत्र्यांचे जाहीर लक्ष वेधले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स