ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
काळसेत तुटलेल्या वीज वाहिनीमुळे महिलेचा दुर्दैवी अंत..!

काळसेत तुटलेल्या वीज वाहिनीमुळे महिलेचा दुर्दैवी अंत..!

प्रकाशन: 23 Aug 2024 11:25 AM
वाचन संख्या 189

चौके | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील काळसे बागवाडी येथे शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शेतीकामासाठी जाणाऱ्या श्रीमती अनिता अंकुश कुडाळकर वय ६५ वर्षे यांचा पायवाटेवर तुटून पडलेल्या विद्युत प्रवाहित तारेवर पाय पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

अनिता कुडाळकर यांना घरी येण्यास उशीर झाल्यामुळे त्यांचा मुलगा भूषण हा त्यांना पाहण्यासाठी गेला असता दुर्घटना त्याच्या निदर्शनास आली.

वाडीतील ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण माड्ये, अनुष्का हेरेकर, नाना खोत, बाळू खोत, भाऊ नार्वेकर, श्रीकांत जावकर हे घटनास्थळी दाखल झाले आणि वीज वितरण चे अधिकारी आणि पोलीस प्रशासनास दुर्घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस पाटील विनायक प्रभु, वायरमन आबा परब,कट्टा पोलिस दुरक्षेत्राचे पोलीस अधिकारी प्रकाश मोरे आणि सिद्धेश चिपकर हे घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान वीज वितरणच्या गलथान कारभारा विरोधात बागबाडी ग्रामस्थ आक्रमक झाले. जोपर्यंत वीज वितरण अधिकारी घटनास्थळी येत नाहीत, तोपर्यंत मृतदेह जाग्यावरुन हलवू देणार नाही. अशी भूमिका घेण्यात आली. दुर्घटनेला सर्वस्वी वीज वितरण जबाबदार आहे. वीज तारावर स्पेसर, गार्डर नसल्यामुळे ही दुर्घटना घडली त्यामुळे वीज वितरणच्या निष्काळजीपणामुळे या महिलेचा प्राण गेला आहे. असा आरोप उपस्थित ग्रामस्थांनी यावेळी केला.

बागवाडीतील कमकुवत विज तारांबद्दल तसेच खाली आलेल्या तारांबद्दल चार महिने अगोदर पासून ग्रामस्थ मागणी करत होते. तसेच २१ ऑगस्ट रोजी कनिष्ठ अभियंता अर्जुन भिसे यांना प्रत्यक्ष भेटून वीज वितरणच्या विद्युत लाईनच्या दुरुस्तीसाठी मागणी बागवाडी ग्रामस्थ यांनी केली होती, नार्वेकर यांनी यावेळी सांगितले. त्यावेळी त्यांनी ग्रामस्थांच्या या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. यामुळे ग्रामस्थ अधिक आक्रमक झाले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 311

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स