ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
सिंधू रनर्सच्या सर्धेत 'ब्युटीज ऑन व्हिल्स' गृपच्या  सदस्यांची विशेष छाप..!

सिंधू रनर्सच्या सर्धेत 'ब्युटीज ऑन व्हिल्स' गृपच्या सदस्यांची विशेष छाप..!

प्रकाशन: 21 Aug 2024 03:44 PM
वाचन संख्या 214

प्रेरणा लोहार, कृतिका लोहार या मायलेकींची विशेष कामगिरी…!

मसुरे | प्रतिनिधी : आरोग्य आणि धावणे याविषयी जनजागृती करण्याचे काम सिंधू रनर टीम गेली ४ वर्षे करत आहे. नुकतीच त्यांची ६ तास व १२ तास सावंतवाडी रन यशस्वी पणे पूर्ण करण्यात आली. या स्पर्धेत ३ तास हा स्पर्धा प्रकार नवीन रनर साठी वाढवला होता. त्याला उत्स्फूर्त सहभाग मिळाला. एकूण ५५ स्पर्धक तिन्ही कॅटेगरी मधून रात्रौ ८ ते सकाळी ८ यावेळेत धावले. या स्पर्धेत ‘ब्युटीज ऑन व्हील्स’ ग्रुपच्या सदस्यांनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेत डॉ सोमनाथ परब यांनी६ तासात ३५किमी , तर
प्रेरणा लोहार, कृतिका लोहार या मायलेकींनी तीन तासात २५ किमी रन पूर्ण केले. त्यांना युवराज लखमराजे भोसले व मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

डाॅ.स्नेहल गोवेकर, काॅम्रेड मॅरॅथाॅन पदकवीर ओंकार पराडकर, काॅम्रेड मॅरॅथाॅन पदकवीर प्रसाद कोरगांवकर, डॉ.प्रशांत मडव, भूषण बांन्देलकर आदिनी ही रन पूर्ण होण्यासाठी विशेष मेहनत घेतली. सहभागी रनरना टीशर्ट, टाइम चिप, व सन्मान चिन्ह देण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स