ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
जय शहा आयसीसीचे 'बिग बाॅस' बनायची शक्यता…!

जय शहा आयसीसीचे 'बिग बाॅस' बनायची शक्यता…!

प्रकाशन: 21 Aug 2024 11:59 AM
वाचन संख्या 103

क्रीडा | ब्युरो न्यूज : आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी आपला कार्यकाळ संपल्यानंतर अध्यक्षपदावरून पायउतार होत असल्याची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत नवीन अध्यक्षपदाची शर्यत रंजक बनली असून यासाठी बीसीसीआयचे विद्यमान सचिव जय शाह यांचे नांव समोर येत आहे.

जय शाह अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभे राहतील की नाही, हे २७ ऑगस्टपर्यंत स्पष्ट होईल. या तारखेपर्यंत उमेदवार आयसीसी अध्यक्षपदासाठी अर्ज करू शकतात. एखादी व्यक्ती तीन वेळा आयसीसीचा अध्यक्ष बनू शकते. त्याचा कार्यकाळ ३ वर्षांचा असतो. न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले लवकरच अध्यक्ष म्हणून चार वर्षे पूर्ण करतील. त्यांचा सध्याचा कार्यकाळ ३० नोव्हेंबर रोजी संपत आहे. म्हणजेच नवे अध्यक्ष १ डिसेंबरपासून पदभार स्वीकारतील. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ ऑगस्ट आहे.

जय शाह ग्रेग बार्कले यांची जागा घेण्यासाठी सर्वात मोठे दावेदार असल्याचं बोललं जात आहे. शाह यांनी २०१९ मध्ये बीसीसीआयचे सचिव म्हणून पदभार स्वीकारला होता. २०२५ मध्ये त्यांना ६ वर्ष पूर्ण होतील. शाह हे सध्या आयसीसीमध्ये आर्थिक आणि व्यावसायिक प्रकरणांचे प्रमुख आहेत.

जय शाह यांच्यासाठी जमेची बाजू म्हणजे, त्यांचे मतदान करणाऱ्या सर्व १६ सदस्यांशी चांगले संबंध आहेत. जर आपण आयसीसीच्या नियमांवर नजर टाकली, तर अध्यक्षपदाच्या निवडणुकीत १६ मतं असतात. विजयासाठी ९ मतांच्या बहुमताची (५१%) आवश्यकता असते. यापूर्वी अध्यक्ष होण्यासाठी दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता होती.

जय शाह वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी आयसीसीचे सर्वात तरुण अध्यक्ष बनून इतिहास रचू शकतात. त्यांच्या आधी जगमोहन दालमिया, शरद पवार, श्रीनिवासन आणि शशांक मनोहर या भारतीयांनी आयसीसीचं अध्यक्षपद भूषवलं आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स