ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
देशभक्तीपर समूहगान स्पर्धेत ओझर विद्यामंदिर ठरले अव्वल ; सलग तिसर्या वर्षी विजेतेपद.

देशभक्तीपर समूहगान स्पर्धेत ओझर विद्यामंदिर ठरले अव्वल ; सलग तिसर्या वर्षी विजेतेपद.

प्रकाशन: 19 Aug 2024 08:08 PM
वाचन संख्या 167

ओझर विद्यामंदिरचे मुख्याध्यापक डी. डी. जाधव यांनी स्वतः लिहून संगीतबद्ध केलेले गीत…!

मसुरे | प्रतिनिधी : स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण येथे संपन्न झालेल्या रोटरी क्लब मालवण आयोजित आणि डॉ. लिमये हॉस्पिटल पुरस्कृत ‘मालवण तालुकास्तरीय देशभक्तीपर समूहगान स्पर्धेमध्ये माध्यमिक गटामध्ये ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेने सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक प्राप्त करून ही हॅटट्रिक साधली आहे.

मन देश सैनिक हे’ हे देशभक्तीपर गीत ओझर विद्यामंदिरचे मुख्याध्यापक डी. डी. जाधव यांनी स्वतः लिहून संगीतबद्ध केलेले होते. या गाण्यासाठी वादनाची साथ मंगेश कदम व श्रीकांत मालवणकर यांनी केली होती. तर संघ व्यवस्थापनाची जबाबदारी प्रवीण पारकर व दिपाली पारकर यांनी पार पाडली. या समूहगीतामध्ये अस्मी पारकर, चिन्मयी पारकर, स्वरा कांबळी, हर्षाली लाड, रिद्धी कदम व तृप्ती परुळेकर या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.

ओझर विद्यामंदिरचे सर्वच शिक्षक विद्यार्थ्यांसाठी रात्रंदिवस कष्ट घेत असतात, त्यामुळे खेड्यातील शाळा असूनसुद्धा या प्रशालेतील मुले अनेक क्षेत्रात सहभागी होऊन यश संपादन करीत असल्याचे दिसून येते. या प्रशालेमध्ये समूहगान, नाट्य अभिनय ,समूह नृत्य, कथाकथन, वक्तृत्व, सूत्रसंचालन, श्रमसंस्कार इत्यादींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जातात. तालुकास्तरीय समूहगान स्पर्धेमध्ये सलग तिसऱ्या वर्षी मिळविलेल्या यशाबद्दल मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समितीचे अध्यक्ष शेखर अर्जुन राणे, सचिव जी. एस. परब, समितीचे अध्यक्ष किशोर नरे यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स