ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
दिविजा वृद्धाश्रमात शालेय विद्यार्थ्यांनी ज्येष्ठांसोबत साजरे केले केले रक्षाबंधन.

दिविजा वृद्धाश्रमात शालेय विद्यार्थ्यांनी ज्येष्ठांसोबत साजरे केले केले रक्षाबंधन.

प्रकाशन: 19 Aug 2024 07:41 PM
वाचन संख्या 219

सिंधुदुर्ग | ब्युरो न्यूज : रक्षाबंधनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळोशी वरचीवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळोशी हडपिड, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हडपिड खालचीवाडी, माध्यमिक शिक्षण शाळा कोळोशी-हडपिड यामधील शालेय विद्यार्थ्यांनी असलदे (ता. कणकवली) येथील दिविजा वृद्धाश्रमात येऊन आजी आजोबांसोबत अगदी आनंदाने व उत्साहाने रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला.

विद्यार्थ्यांनी राखी बांधल्यावर दिविजा वृद्धाश्रम मार्फत गोड खाऊ देण्यात आले. यावेळी आजी-आजोबा आपल्या नातवंडांचे प्रेम पाहून भावनिक झाले होते. काही आजोबांच्या डोळ्यात आनंदाश्रू टिपकताना दिसत होते. काही आजी आजोबा कित्येक वर्षानंतर पुन्हा नातवंडानी राखी बांधली याचा आनंद व्यक्त करत होते. विद्यार्थ्यांनी आजी आजोबांसाठी नृत्य, गीत व पोवाडे सादर करून आजी आजोबांना तीन तास मंत्रमुग्ध केले होते. आजी आजोबाही आपले आजारपण विसरून त्यांच्या सोबत आनंदात सहभागी झाले होते. तसेच विद्यार्थ्यांसाठी आश्रमचे कर्मचारी समीर मिठबावकर व सखाराम कोकरे यांनी फनी गेम्स चे आयोजन केले होते. या खेळात विजेता विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन दिविजा वृद्धाश्रमाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.

शालेय शिक्षक अश्विनी गर्जे, श्री. पवार, श्रीम बबीता मुंढे, श्रीम स्मित गुरव, जयेंद्र चव्हाण यांनी नारळ फोडण्याचा खेळामध्ये उत्साहाने भाग घेतला. आश्रमातील आजोबा वामन जोशी, सतेज रणखांबे यांनीही नारळ वाढवणे खेळ खेळून नारळी पौर्णिमेची परंपरा जपली. आजी आजोबांनी विद्यार्थ्यांसोबत पंचपकवान्नांचा आस्वाद घेतला.

या कार्यक्रमाचे नियोजन अश्विनी पटकारे यांनी केले होते. आजी आजोबांना पारंपारिक कपडे नेसवण्याचे काम सायली तांबे, अस्मि राणे व अर्चना इंदप यांनी केले. या आश्रमाचे सेक्रेटरी संदेश शेट्ये यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांना या अविस्मरणीय रक्षाबंधन करण्याचा विद्यार्थी व त्यांच्या शिक्षकांनी घेतलेला सहभाग खरच लाखमोलाचा ठरणार आहे. शिक्षक व विद्यार्थ्यांनी सामाजिक बंधिलकेचा धडा वृद्धाश्रमात येऊन दाखविला आहे. शिक्षकांच्या सहकार्यामुळे आजी आजोबांच्या जीवनात एक दिवसाचा नातवंडांचा सुखवास मिळाल्यामुळे आजी आजोबांनी शिक्षकांनाही भरभरून आशीर्वाद दिले.

( निकेत पावसकर | तरेळे प्रतिनिधी )

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स