बोरीवली पासून थेट कोकणात...!
मुंबई |
बोरिवली येथून कोकणात जाण्यासाठी एक नियमित रेल्वे सुरु होणार आहे. बोरिवली ते सावंतवाडी अशी गाडी येत्या २४ ऑगस्ट रोजी चालू होणार आहे. या गाडीचे वेळापत्रक, थांबे आणि इतर माहिती दिनांक २३ ऑगस्टपूर्वी जाहीर करण्यात येणार आहे बोरिवली-दहिसर, कांदिवली, गोरेगाव, जोगेश्वरी या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात कोकणकर जनतेची वस्ती आहे. कोकणात जाण्यास गाडी पकडण्यासाठी त्यांना दादर किंवा वसई या ठिकाणी जावे लागते. त्यामुळे बोरिवली येथून कोकणसाठी नियमित स्वरूपात गाडी चालविण्यात यावी यासाठी खूप वर्षांपासून मागणी होती. ती मागणी पूर्णत्वास गेल्याने चाकरमानी समाधान व्यक्त करत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)