ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
भाजपच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन करणाऱ्या फार्मासिस्ट उमेश कोल्हे हत्या प्रकरणात पीडित कुटुंबाच्या वतीने ऍड. श्रीराम धोंडू चिंदरकर यांची नियुक्ती.
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सर्व आरोपींविरुद्ध भारतातील सर्वात कठोर दहशतवादविरोधी कायदा.

मुंबई | ब्यूरो न्यूज : अमरावती येथील उमेश कोल्हे हत्या प्रकरण हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशात गाजलेले अत्यंत संवेदनशील आणि पूर्वनियोजित हत्याकांड मानले जाते. या हत्येचे मुख्य आणि एकमेव कारण होते ते म्हणजे भाजपच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी २०२२ मध्ये एका टीव्ही वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान इस्लाम धर्माचे प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी केलेले आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य होय. त्यामुळे देशभरातून अनेक कट्टरपंथी मुस्लिम संघटनांकडून त्याचा विरोध करण्यात आला होता. या वक्तव्याचे तीव्र पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेषतः आखाती देशांमध्ये उमटले. अनेक मुस्लिमबहुल देशांनी यावर आक्षेप नोंदवत विरोध दर्शवला होता.

२१ जून २०२२ रोजी अमरावतीत ५४ वर्षीय औषध विक्रेते (केमिस्ट) उमेश प्रल्हादराव कोल्हे यांची समाज माध्यमांवरील एका पोस्टच्या वादातून म्हणजे जून २०२२ रोजी उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्माच्या वक्तव्याच्या समर्थनार्थ तिच्या फोटोसह एक संदेश शेअर केला होता. त्यानंतर त्यांची त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. 

देशातील सर्वोच्च यंत्रणा राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) ने याचा तपास केला असून एकूण ११ आरोपींना या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. सर्व आरोपींविरुद्ध भारतातील सर्वात कठोर दहशतवादविरोधी कायदा म्हणजे "बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंधक) कायदा १९६७ " (Unlawful Activities Prevention Act 1967) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून मुंबई विशेष सत्र न्यायालयात दोषारोप दाखल करण्यात आले आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या (NIA) म्हणण्यानुसार, ही हत्या पूर्वनियोजित होती आणि देशभरात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा हेतू होता. तसेच "गुस्ताख-ए-नबी की एक सजा, सर तन से जुदा" एनआयएने आपल्या आरोपपत्रात या घोषणेचाही उल्लेख केला आहे. याच प्रेरणेतून या ११ जणांनी फार्मसिस्ट उमेश कोल्हे यांच्या हत्येचा कट रचला होता असा आरोप आहे.. 

सदरच्या प्रकरणात आता पीडित कुटुंबाच्या वतीने न्यायालयात त्यांची बाजू मांडण्यासाठी ऍड. श्रीराम चिंदरकर व सहकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून पीडित कुटुंबाला योग्य तो न्याय मिळावा व सर्व कट्टरपंथी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आपण न्यायालयात त्यांची बाजू मांडणार असल्याचे ऍड. श्रीराम चिंदरकर यांनी सांगितले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन.

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आर...

14 Sep 2026 440
श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा.

श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नि...

14 Sep 2026 208

लोकप्रिय टॅग्स