ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बागवे हायस्कूल  मसुरे येथे दत्तक पालक योजनेअंतर्गत २० विद्यार्थी दत्तक.!

बागवे हायस्कूल मसुरे येथे दत्तक पालक योजनेअंतर्गत २० विद्यार्थी दत्तक.!

प्रकाशन: 10 Aug 2024 07:22 PM
वाचन संख्या 63

मसुरे |

मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कूल या प्रशालेच्या http://localhost/news/public/uploads/20 विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थ्यांच्या वतीने दत्तक पालक योजनेअंतर्गत दत्तक घेण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले. शालेय गणवेश,दप्तर, छत्री, पॅड व लेखन साहित्य मिळून 2,000 रू. किमतीच्या वस्तू प्रत्येक विद्यार्थ्यांना देण्यात आल्या.

यामध्ये अमरोझ फर्नांडिस यांनी 5 विद्यार्थी, राजन गोरे यांनी 2 विद्यार्थी, सुदाम परब यांनी 2 विद्यार्थी, पुष्पा बागवे (प्रिती राणे) यांनी 2 विद्यार्थी, रमेश पाताडे, अर्चना कोदे व आप्पा परब प्रत्येकी एक विद्यार्थी,याशिवाय राजन परब १, प्रसाद बागवे १ असे विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांचा संपूर्ण वर्षभराचा शैक्षणिक खर्च करण्यात येणार आहे.याशिवाय 3 गरीब होतकरू विद्यार्थ्यांना वर्षभरातील मोफत एस टी पास देण्यात येणार आहे.

यावेळी व्यासपीठावर प्रशालेच्या मुख्याध्यापिका अर्चना कोदे, रमेश पाताडे , एन एस जाधव , घाटे , समीर नाईक , श्रीमती जाधव , श्रीमती भोगले व श्रीमती तळाशीलकर तसेच जगदीश चव्हाण संस्था सभासद उपस्थित होते. मुख्याध्यापकांनी सर्व दात्यांना धन्यवाद दिले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन श्री रमेश पाताडे यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स