ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आपल्या शहरात बांग्लादेशी आहेत..!

आपल्या शहरात बांग्लादेशी आहेत..!

प्रकाशन: 06 Aug 2024 07:48 PM
वाचन संख्या 64

शहरवासियांचे बांदा पोलिसांना निवेदन.

बांदा :राकेश परब ( सहसंपादक आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल):
बांदा शहरात मोलमजूरीच्या निमित्ताने कित्येक बांगलादेशी हे बेकायदा वास्तव्य करून राहत आहेत. शहरात कोणीही भाडेकरू ठेवताना किंवा कामासाठी कामगार ठेवताना त्याची पूर्णपणे शहानिशा, खात्री करावी तसेच त्याचा आधारकार्ड पुरावा हा तात्काळ पोलीस ठाण्यात जमा करून त्याची सविस्तर माहिती द्यावी, यासाठी आपण आपल्या स्तरावर उचित व तात्काळ कार्यवाही करावी अशी लेखी मागणी बांदा शहरातील नागरिकांनी आज बांदा पोलीस निरीक्षक विकास बडवे यांच्याकडे केली.
निवेदनात म्हटले आहे कि, बांदा शहरात अनेक परप्रांतीय चेहेरे हे मोठ्या संख्येने दृष्टीस पडत असून भविष्यात ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास आपली स्थानिक पिढी ही अल्पसंख्यांक म्हणून गणली जाईल.

यासाठी अशा परप्रांतीय बांगलादेशीचा शोध घ्यावा तसेच घर मालकांना भाडेकरू ठेवताना वरील नियमांबाबत अवगत करावे व सक्त सूचना द्याव्यात. पोलीस निरीक्षक बडवे म्हणाले, आपल्या लेखी मागणीनुसार यासंदर्भात ग्रामपंचायतला पत्र देण्यात येईल. घरमालकांनी भाडेकरू ठेवताना कागदपत्रांची पडताळणी करण्याबाबत आवश्यक सूचना देण्याबाबत कार्यवाही करावी. तसेच रात्रीच्या वेळी संशयास्पद फिरताना परप्रांतीय आढळले तर याची तात्काळ माहिती बांदा पोलीस ठाण्याला द्यावी असे आवाहन निरीक्षक बडवे यांनी यावेळी केले.
यावेळी केदार कणबर्गी, ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, प्रशांत बांदेकर, रत्नाकर आगलावे, भूषण सावंत, सौ. गौरी बांदेकर, सुदन केसरकर, शैलेश केसरकर, निलेश मोरजकर, शैलेश लाड, नंदादीप केळुस्कर, प्रथमेश पडवळ, विराज देसाई, जयप्रकाश सावंत, नार्वेकर आदिसह बांद्यातील नागरिक उपस्थित होते.

बांदा :राकेश परब ( सहसंपादक आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल):
बांदा शहरात मोलमजूरीच्या निमित्ताने कित्येक बांगलादेशी हे बेकायदा वास्तव्य करून राहत आहेत. शहरात कोणीही भाडेकरू ठेवताना किंवा कामासाठी कामगार ठेवताना त्याची पूर्णपणे शहानिशा, खात्री करावी तसेच त्याचा आधारकार्ड पुरावा हा तात्काळ पोलीस ठाण्यात जमा करून त्याची सविस्तर माहिती द्यावी, यासाठी आपण आपल्या स्तरावर उचित व तात्काळ कार्यवाही करावी अशी लेखी मागणी बांदा शहरातील नागरिकांनी आज बांदा पोलीस निरीक्षक विकास बडवे यांच्याकडे केली.
निवेदनात म्हटले आहे कि, बांदा शहरात अनेक परप्रांतीय चेहेरे हे मोठ्या संख्येने दृष्टीस पडत असून भविष्यात ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास आपली स्थानिक पिढी ही अल्पसंख्यांक म्हणून गणली जाईल. यासाठी अशा परप्रांतीय बांगलादेशीचा शोध घ्यावा तसेच घर मालकांना भाडेकरू ठेवताना वरील नियमांबाबत अवगत करावे व सक्त सूचना द्याव्यात.
पोलीस निरीक्षक बडवे म्हणाले, आपल्या लेखी मागणीनुसार यासंदर्भात ग्रामपंचायतला पत्र देण्यात येईल. घरमालकांनी भाडेकरू ठेवताना कागदपत्रांची पडताळणी करण्याबाबत आवश्यक सूचना देण्याबाबत कार्यवाही करावी. तसेच रात्रीच्या वेळी संशयास्पद फिरताना परप्रांतीय आढळले तर याची तात्काळ माहिती बांदा पोलीस ठाण्याला द्यावी असे आवाहन निरीक्षक बडवे यांनी यावेळी केले.
यावेळी केदार कणबर्गी, ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, प्रशांत बांदेकर, रत्नाकर आगलावे, भूषण सावंत, सौ. गौरी बांदेकर, सुदन केसरकर, शैलेश केसरकर, निलेश मोरजकर, शैलेश लाड, नंदादीप केळुस्कर, प्रथमेश पडवळ, विराज देसाई, जयप्रकाश सावंत, नार्वेकर आदिसह बांद्यातील नागरिक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स