ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
या सत्कारातून झालेला सन्मान हा आत्म सन्मानाचा गौरव - मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे.

या सत्कारातून झालेला सन्मान हा आत्म सन्मानाचा गौरव - मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे.

प्रकाशन: 06 Aug 2024 05:53 AM
वाचन संख्या 43

अक्कलकोट | प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थांचे दर्शन घडणे म्हणजे माझ्यासारख्या स्वामी भक्तांसाठी अत्यंत आनंददायी बाब आहे. स्वामी दर्शनानंतर मंदिर समिती कडून महेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार होण म्हणजे आपल्या आत्मसन्मानाचे गौरव असल्याचे मनोगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. त्यांनी नुकतीच अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी राज ठाकरे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला.

या वेळी राज ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पुढे बोलताना राज ठाकरे यांनी श्री वटवृक्ष स्वामी समर्थांची स्वामी भक्ती नेहमीच आपण करीत आलेलो आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने माझी व माझ्या कुटुंबीयांची जीवन वाटचाल सुरू आहे असे भावोद्गार काढले. मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या कार्याने श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या धार्मिक कार्याची चौफेर प्रगती झालेली आहे असेही मनोगत व्यक्त करून महेश इंगळे व श्री वटवृक्ष महाराज देवस्थानच्या कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे, प्रथमेश इंगळे, मनसेचे आमदार बाळा नांदगावकर, मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर, सोलापूर मनसे नेते दिलीप धोत्रे, सचिन मोरे, तालुका अध्यक्ष मल्लिनाथ पाटील, राम मातोळे, नागेश कुंभार, बाबू वागस्कर, प्रशांत गिड्डे, प्रशांत इंगळे, जैनुद्दीन शेख, श्रीकांत पाटील, देवेंद्र शिंदे, तम्मा आळवेकर, आदर्श अंकलगी, समर्थ नरगे, पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, ए.पी.आय.बागव, पी.एस.आय.खापरे, मंदार महाराज पुजारी, व्यंकटेश पुजारी, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, संजय पवार, खाजप्पा झंपले, ऋषिकेश लोणारी, सागर गोंडाळ, अविनाश क्षीरसागर, महेश मस्कले, जयप्रकाश तोळणूरे, शिंदे व मनसेचे अन्य कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स