ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मार्केटच्या वास्तू उद्घाटन संदर्भात सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच बाळू सावंत खवळले..!

मार्केटच्या वास्तू उद्घाटन संदर्भात सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच बाळू सावंत खवळले..!

प्रकाशन: 06 Aug 2024 06:09 AM
वाचन संख्या 56

बांदा | राकेश परब ( सहसंपादक , आपली सिंधुनगरी न्यूज ) : पूर्णत्वास आलेल्या मच्छी मार्केटच्या वास्तूचे उद्घाटन करण्याचे ग्रामपंचायतीने एकत्रित बसवून ठरविले असताना सदरची माहिती उ. बा. ठा. चे सदस्य साईप्रसाद काणेकर यांना मिळताच त्यांनी उदघाटनाची अशी मागणी करणे खोडसाळ ाचे आहे.उदघाटन होणारच आहे याची कुणकुण लागताच उलट उदघाटनाची मागणी करुन आपल्यामुळे काम मार्गी लागले असा आव आणायचा हा प्रकार निव्वळ हास्यस्पद आहे. यामधून उ. बा. ठा. सदस्या ची बुद्धी च दिसून येते. वेळोवेळी केलेल्या लोकोपयोगी कामांची आणि विविध योजनांची सत्याधाऱ्यांबरोबर बसून माहिती घेऊन काम पूर्णत्वास ते आच केल्याचा आव आणण्याचे काम ते करत आहेत.

या प्रसिद्धी पत्रकात असे म्हटले आहे उबाठाचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांच्या नेतृत्वात येणाऱ्या मोर्चाचा मुळात जी व्यक्ती पंचायत समिती सदस्य असताना स्वतःच्या माटणे गावचा आणि पंचायत समिती क्षेत्राचा पाणी प्रश्न सोडू शकत नाही आणि तेही तिराळीसारखे धरण जवळ असताना त्या व्यक्तीला बांदा ग्रामपंचायतीवर, पाणी नियोजनाच्या विषयावर मोर्चाच काय बोलण्याचाही नैतिक अधिकार नाही.
तरीही जर बाबुराव धुरी आणि काणेकर यांना उद्घाटनाच्या उत्सवांची हौस असल्यास अधिकृत उद्घाटनाच्या कार्यक्रमाला फटाके आणि ढोल पथक घेऊन अवश्य यावे आम्ही त्यांचे स्वागतच करू.
काणेकर यांनी स्वतःच मान्य केल्याप्रमाणे बांदा ग्रामपंचायतीवर गेली 30 वर्ष भाजपाची निर्विवाद सत्ता आहे.
गेली 30-35 वर्षे बांदा ग्रामपंचायत तर्फे केली गेलेली विविध विकास कामे विचारात घेता लोकांकडून मिळालेली ही पोच पावतीच आहे. कोणत्याही कामाला विरोध करणे सोपे असते, प्रत्यक्षात कोणत्याही योजनेची अंमलबजावणी करताना त्याच्या पूर्णत्वासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आणि तांत्रिकदृष्ट्या ही वेळ द्यावा लागतो तो कामांप्रमाणे बऱ्याचदा कमी अधिक असतो. म्हणून बांदा गावाच्या विकासासाठी बांदा ग्रामपंचायत चे सत्ताधारी पक्ष म्हणून आम्ही सर्व सदस्य सक्षम आहोत. आणि सर्व विकासाधीन कामे आणि विविध योजनांच्या चांगल्या अंमलबजावणीसाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स