ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
छोटू ठाकूर भडकले..!

छोटू ठाकूर भडकले..!

प्रकाशन: 06 Aug 2024 04:48 AM
वाचन संख्या 107

मसुरे | प्रतिनिधी : मसुरे पशुवैद्यकीय दवाखाना येथील पशुवैद्यकीय अधिकारी गेले कित्येक महिने कायमस्वरूपी न मिळाल्यामुळे येथील शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत.

सद्यस्थितीत पावसाळा सुरू असल्यामुळे जनावरांना विविध प्रकारचे आजार होत आहेत. आपल्या पशुना झालेले आजार बरे करण्यासाठी येथील शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. याबाबत संबंधित विभागास दूरध्वनीवरून संपर्क साधूनही अद्याप पर्यंत मसुरे येथे कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध नाही. येत्या चार दिवसात संबंधित कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी मसूरे येथे हजर न झाल्यास मसुरे भारतीय जनता पक्षाच्या वतीने संबंधित जिल्हा परिषद पशुवैद्यकीय अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा मालवण पंचायत समितीचे सभापती छोटू ठाकूर, सरपंच लक्ष्मी पेडणेकर आणि शिवाजी परब यांनी दिला आहे. तसेच याबाबत खासदार निलेश राणे यांच्याकडेही या खात्याच्या दुर्लक्षित कामाबाबत तक्रार करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स