ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
महाराष्ट्रातील एकमेव गाव जिथ एकदा पाऊस सुरु झाला की सात आठ दिवस थांबतच नाही; कोकणातील स्वर्ग

महाराष्ट्रातील एकमेव गाव जिथ एकदा पाऊस सुरु झाला की सात आठ दिवस थांबतच नाही; कोकणातील स्वर्ग

प्रकाशन: 03 Aug 2024 11:51 AM
वाचन संख्या 261

विशेष वृत्त |

हिरवीगार झाडी… नागमोडी वळणाचा रस्ता… परिसरात पूर्णपणे धुके… थंड वातावरण… डोंगरावरून कोसळणारे धबधबे… अशा सर्व गोष्टीनी वेढलेले हे गाव सध्या रत्नागिरीतलं मीनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते. या गावातील पाऊस देखील तितकाच खास आहे.

एका डोंगरावर वसलेले माचाळ घनदाट जंगलानी समृद्ध तर आहेच पण इथल्या जंगलाचं वैशिष्टय़ हे की या जंगलांमध्ये औषधी वनस्पती मोठय़ा प्रमाणात आढळतात आणि म्हणूनच या ठिकाणी आल्यावर इथला निसर्ग पाहिल्यानंतर पर्यटकांना या ठिकाणाबद्दल शब्दात वर्णन करणं कठीण जातं.

माचाळची दुसरी खासियत म्हणजे इथून विशाळगडावर एक ते दीड तासांत पोचता येतं. माचाळचे ग्रामस्थही विशाळगडावर पाणी, दूध पुरवणे किंवा इतर कामांसाठी सतत येऊन जाऊन असतात.

अवघे तीनशे ते चारशे लोकवस्तीचं हे माचाळ गाव आहे. येथील घरे कौलारु डोंगर उताराची आणि मातीची आहेत. पावसाळ्यात येथे कायम धुके असते त्यामुळे घरांच्या चहूबाजूला झाडांच्या पानांनी पूर्णपणे शाकारणी करावी लागते.

माचाळ गावातून मुचकुंदी नदीचा उगम होतो खरं तर या गावात मुचकुंदी ऋषिंची गुहा आहे याच ठिकाणाहून या नदीचा उगम झाल्याचं सांगितलं जातं त्यामुळेच या नदीला मुचकुंदी नदी असं संबोधलं जातं.

खाली उतरलेले आभाळ. आल्हाददायक स्वच्छ हवा. या वातावरणातला प्रवास आपल्याला ताजातवाना करतो आणि पावसाळ्यात हे गाव पर्यटकांना खासकरून खुणावतो.

लांजा तालुक्यातील छोटसं माचाळ गाव समुद्र सपाटीपासून सुमारे चार हजार फुटांवर वसलेलं आहे. या गावाला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने थंड हवेचे ठिकाण अर्थात पर्यटनस्थळ म्हणून घोषित केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स