ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
बांदा इनरव्हील क्लब पदग्रहण सोहळा उत्साहात

बांदा इनरव्हील क्लब पदग्रहण सोहळा उत्साहात

प्रकाशन: 03 Aug 2024 11:34 AM
वाचन संख्या 321

बांदा : राकेश परब

इनरव्हील क्लब ऑफ बांदाचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. बांदा विविध कार्यकारी सोसायटी च्या आळवणी सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात क्लब च्या अध्यक्षपदी अर्चना पांगम, उपाध्यक्षपदी रूपाली शिरसाट, सेक्रेटरीपदी प्रियांका हरमलकर, खजिनदारपदी श्वेता येडवे, आय.एस.ओ. पदी निनता गोवेकर तर एडिटरपदी अक्षता साळगांवकर यांची नियुक्ती करण्यात आली . या सोहळ्याच्या विशेष अतिथी इनरव्हील क्लब सावंतवाडीच्या माजी अध्यक्ष रिया रेडिज आणि माजी सेक्रेटरी डॉ. मीना जोशी यांच्या हस्ते सर्व पदाधिकारी तसेच नवीन सदस्य यांचे पदग्रहण झाले. कार्यक्रमाचे उद् घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.यावेळी विशेष अतिथी म्हणून पतंजली योगचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी योग शिक्षक चंद्रशेखऱ बांदेकर उपस्थित होते.त्यांनी उत्तम आरोग्यासाठी महिलांनी नियमित योगासने व प्राणायाम करुन निरोगी राहण्याबाबत मार्गदर्शन केले.इनरव्हिल क्लबतर्फे त्यांचा योगशिक्षण प्रसारकार्याबद्दल सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात इनरव्हील क्लब ऑफ बांदाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.तसेच गरजू विद्यार्थीनीला गणवेश तसेच गरजू महिलेला शिलाई मशिन प्रदान करण्यात आली. रिया रेडिज यांनी आपल्या मनोगतात बांदा क्लबने या वर्षभरात विविधी समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्याचे आवाहन केले.तसेच वाटचालीस शुभेच्छा सहकार्याचे आश्वासन दिले. सावंतवाडी इनरव्हील क्लब अध्यक्ष सुमेधा धुरी व सेक्रेटरी चित्रा देसाई यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. राखी कळंगुटकर,चित्रा भिसे,श्रुती वळंजु,सोनाली राणे,अनुराधा धामापुरकर,माधवी गाड,मृणाल तोरसकर आदी या बांदा क्लबच्या सदस्य बनल्या आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्चना पांगम यांनी, सूत्रसंचालन अक्षता साळगांवकर यांनी तर आभारप्रदर्शन माधवी गाड यांनी केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स