ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
मोठ्या घसरणीतही अदानींच्या ह्या शेअर्समध्ये तुफान तेजी, व्यवसायाबाबत मोठी घोषणा

मोठ्या घसरणीतही अदानींच्या ह्या शेअर्समध्ये तुफान तेजी, व्यवसायाबाबत मोठी घोषणा

प्रकाशन: 02 Aug 2024 09:08 PM
वाचन संख्या 157

कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत 1454 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा कमावला आहे. नफ्यात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 116 टक्के वाढ झाली आहे.

मुंबई : देशातील शेअर बाजार शुक्रवारी 2 ऑगस्ट रोजी कोसळले आहेत. मात्र, या मोठ्या पडझडीतही अदानी समूहाची कंपनी अदानी विल्मर लिमिटेडच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. अदानी विल्मरचे शेअर्स 5 टक्क्यांहून अधिक वाढून 370.75 रुपयांवर पोहोचले. गुरुवारी कंपनीचा शेअर 348.20 रुपयांवर बंद झाला होता. अदानी विल्मारच्या शेअर्समध्ये ही वाढ मोठ्या घोषणेनंतर झाली आहे. अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड ने गुरुवारी कंपनीच्या फूड-एफएमसीजी व्यवसायाचे डिमर्जर आणि अदानी विल्मरसोबत सामील करण्यास मान्यता दिली.

अदानी एंटरप्रायझेसची 43.94 टक्के हिस्सेदारी

अदानी एंटरप्रायजेस लिमिटेडकडे अदानी विल्मारमध्ये 43.94 टक्के हिस्सा आहे. अदानी एंटरप्रायझेसने अदानी कमाॅडिटीजच्या माध्यमातून अदानी विल्मारमध्ये हे भागभांडवल आहे. डिमर्जरनंत अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडच्या भागधारकांना अदानी एंटरप्रायझेसच्या प्रत्येक 500 शेअर्समागे अदानी विल्मरचे 251 शेअर्स मिळतील किंवा गुंतवणूकदारांना त्याच प्रमाणात शेअर्स मिळतील. डिमर्जर योजनेमध्ये अदानी कमाॅडिटीजमधील अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडच्या धोरणात्मक गुंतवणुकीचाही समावेश आहे.

अदानी एंटरप्रायझेसच्या नफ्यात वाढ

अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसने चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत 1454 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा कमावला आहे. अदानी एंटरप्रायझेसच्या नफ्यात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 116 टक्के वाढ झाली आहे. अदानी एंटरप्रायझेसने वर्षभरापूर्वी याच कालावधीत 674 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. कंपनीचा महसूल वार्षिक आधारावर 12 टक्के वाढून 25472 कोटी रुपये झाला आहे.

शेअर्स एका वर्षात 8 टक्के घसरले

अदानी विल्मरचे शेअर्स गेल्या एका वर्षात 8 टक्के घसरले आहेत. कंपनीचे शेअर्स 2 ऑगस्ट http://localhost/news/public/uploads/2023 रोजी 400.40 रुपयांवर होते. तर 2 ऑगस्ट http://localhost/news/public/uploads/2024 रोजी शेअर्स 370.75 रुपयांवर व्यवहार करत आहेत. अदानी विल्मर शेअर्सची 52 आठवड्यांची उच्च पातळी 414.45 रुपये आहे. त्याच वेळी 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 285.85 रुपये आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स