ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
६ ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन..!

६ ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन..!

प्रकाशन: 31 Jul 2024 10:01 AM
वाचन संख्या 119

संतोष साळसकर | सहसंपादक :
स्थानिक भरती बेरोजगार संघर्ष समिती सिंधुदुर्गच्यावतीने स्थानिक टीईटी, सीटीटी पात्र, अभियोग्यताधारक डीएड पदवीधारकांच्या हक्कासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदे समोर मंगळवार दिनांक ६ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत लाक्षणिक धरणे आंदोलन केले जाणार आहे.

टीईटी अपात्र असणाऱ्या डीएड धारकांना जिल्हा परिषदेवरील कमी पटाच्या शाळांवर १५ हजार मानधनावर नियुक्ती देण्याबाबतची समाज माध्यमातील बातमी वाचनात आल्यानंतर त्या बातमीतील आंदोलनकर्त्यांशी संपर्क साधला असता त्यांनी जिल्ह्यातील २१५ उमेदवारांची यादी शासनाकडे दिल्याचे सांगितले. त्या यादीत टीईटी, सीटीटी पात्र, अभियोग्यताधारक डीएड पदवीधारकांची नावे आढळून आलेली नाहीत. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुतांश उमेदवार हे टीईटी, सीटीटी, अभियोग्यताधारक आहेत हे सदर आंदोलकांकडून जाणीवपूर्वक लपवून ठेवण्यात आली त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात टीईटी, सीटीटी, अभियोग्यताधारक डीएड पदवीधारकच नाहीत असे चित्र सर्वांसमोर दाखविण्यात आले. यामुळे या नियुक्तीच्या वेळी पात्र उमेदवारांवर अन्याय होणार आहे. या अन्यायावर आवाज उठवण्यासाठी सदर आंदोलन करून शासनाकडे दाद मागितली जाणार आहे. शासनाने डावलून निर्णय घेतल्यास न्यायालयाचे दरवाजे ही ठोठावणार अशी तयारी समिती मार्फत जाहीर करण्यात आली आहे.
सदर आंदोलनास बहुसंख्येने टीईटी/सीटीईटी अभियोग्यताधारक डीएड पदवीधारकांनी व त्या २१५ यादीत समावेश नसलेले डीएड TET अपात्र उमेदवारांनी सहभागी व्हावे असे आवाहन स्थानिक भरती बेरोजगार संघर्ष समिती सिंधुदुर्गचे अध्यक्ष विनय गायकवाड यांनी केलेले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स