ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
शेर्ले येथे झाड कोसळून विद्युत वाहिनीवर पडले

शेर्ले येथे झाड कोसळून विद्युत वाहिनीवर पडले

प्रकाशन: 29 Jul 2024 10:27 PM
वाचन संख्या 54

बांदा / राकेश परब: आठवडाभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पडझडीचे सत्र सुरू आहे. शनिवारी सकाळी शेर्ले येथे झाड कोसळून विद्युत वाहिनीवर पडले. तत्काळ याची खबर वीज वितरणला देण्यात आली व वीजपुरवठा खंडित करण्यात आला. दरम्यान रस्त्यावरून वाहतूक नसल्याने अनर्थ टळला.बांदा शिरोडा मार्गावरील शेर्ले येथे शनिवारी सकाळी वादळी वारापाऊस झाला. यावेळी अनेक ठिकाणी पडझड झाली. धोकादायक झाडांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष एक दिवस प्रवासी किंवा वाहनचालकाच्या अपघातास कारणीभूत ठरेल अशा संतप्त प्रतिक्रिया यावेळी ग्रामस्थांनी दिल्या. दुपारपर्यंत ग्रामस्थांनी वाहिन्यांवर व रस्त्यावर पडलेले झाड हटवले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स