ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
कोकण हार्टेड गर्ल' अंकिता प्रभू-वालावलकर दाखवणार 'बिग बॉस मराठी'च्या घरात कोकणी हिसका
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

कोकण हार्टेड गर्ल' अंकिता प्रभू-वालावलकर दाखवणार 'बिग बॉस मराठी'च्या घरात कोकणी हिसका

प्रकाशन: 30 Jul 2024 02:16 PM
वाचन संख्या 114

अंकिता प्रभू-वालावलकरने ‘बिग बॉस’च्या घरात जाण्याआधी शेवटचा कॉल कोणाला केला? ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणाली…

ब्युरो न्यूज मुंबई: महाराष्ट्रातील तमाम रसिकांचा लाडका असलेला ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यंदाच्या सीझनमध्ये शोमध्ये बरेच मोठे बदल झाल्याचे आपल्याला दिसून आले आहेत. मग ते नव्या होस्टचं येणं असो.. किंवा मग नवा खेळाडू.. सगळं कसं जबरदस्त पॉवरने भरलेलं आहे. यंदा ‘बिग बॉस मराठी’चे सूत्रसंचालन महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार रितेश विलासराव देशमुख करत आहे. नुकताच या शोचा ग्रँड प्रिमियर दणक्यात पार पडला. दरवेळी प्रमाणे यंदाही 16 स्पर्धकांची एन्ट्री झाली असून या स्पर्धकांमध्ये मालवणची ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अंकिता प्रभू-वालावलकर ‘बिग बॉस मराठी’च्या घरात धमाका करायला सज्ज झाली आहे. सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असलेल्या अंकिताने तिच्या अनोख्या अंदाजाने आणि ओळखीनं प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे.

अंकिताने ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचं घरी सांगितलं तेव्हा तिच्या आईला एकंदरीतच तिची काळजी वाटली. याबद्दल अंकिता म्हणाली,”तू घरात कशी काम करशील? भांडी घासशील?” असे आईचे प्रश्न सुरू झाले. बाबांना कळलं तेव्हा त्यांची प्रतिक्रिया विचित्र होती. ते थेट म्हणाले,”तू घरी परत कधी येणार?”

.अंकिता पुढे म्हणाली,”मी पहिल्यांदाच फोनशिवाय कुठेतरी राहणार आहे. याबद्दल मला थोडं अवघड वाटतंय, पण माझा निर्धार मात्र पक्का आहे. जर ‘बिग बॉस’ने मला संधी दिली घरात काहीतरी घेऊन जायचं, तर मी माझा फोन घेऊन जाईन. फोनशिवाय राहाणं मला कठीण वाटत असलं तरी मी माझ्या कोकणी अंदाजात सगळ्यांना प्रभावित करण्यासाठी आता घरात सज्ज आहे. माझ्या मित्रांनी देखील मला सल्ले दिले आहेत की, घरात जाऊन जा भांडण कर जोरदार, भांडण केलेस तरच टिकशील. पण माझे असं आहे की, मी यावेळी नव्या सीझनमध्ये काही तरी वेगळे दाखवणार आहे. न भांडता छान वागून पॉझिटिव्ह राहीन. मी घरात जाण्याआधी शेवटचा फोन होणाऱ्या नवऱ्याला केला. त्याला सांगितले की, सगळ्यांची काळजी घे. आता गणपती येणार आहेत तर घरात सगळे सेट कर लक्ष असू दे.

“अंकिताचा प्रवास अनोखा आणि रोमांचक ठरणार आहे. कोकणाच्या साधेपणाने आणि आपुलकीने ओतप्रोत भरलेली अंकिता नक्कीच ‘बिग बॉस’च्या घरात एक नवीन रंग भरणार आहे. तिची कोकणी भाषा, तिच्या गावची खासियत, आणि तिचं अनोखं वागणं यामुळे प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव मिळणार हे नक्कीच!

प्रेक्षकांसाठी एक मोठी उत्सुकता आहे की, अंकिता प्रभू-वालावलकर ‘बिग बॉस’च्या घरात कोणता कोकणी हिसका दाखवणार आहे आणि तिच्या या प्रवासात काय-काय घडणार आहे. तिच्या फॅन्सनी तिला शुभेच्छा देण्यासाठी सज्ज व्हायला हवं, कारण ‘कोकण हार्टेड गर्ल’ आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरात दाखल झाली आहे

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स