रत्नागिरी पोलीस सेवेत कार्यरत सावर्डे गावचे सुपुत्र श्री.विलास विठोबा दिडपसे, यांचा शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ,सन्मानचिन्ह देऊन केला सत्कार
बांदा /राकेश परब: रत्नागिरी पोलीस सेवेत सध्या कार्यरत असलेले सावर्डे गावचे सुपुत्र श्री.विलास विठोबा दिडपसे, यांची नूकतीच पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाली.ते सावर्डे गावचे सुपुत्र आहेत. त्यांच्या शांत मनमीळाऊ स्वभावाने मोठा मित्र परीवार आहे.त्यांची पदोन्नती झाल्याने त्यांच्या १९८५ सालीच्या बॅच वर्गमित्रांनी शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. यावेळी दिडपसे यांनी बोलताना माझ्या वर्गमित्रांनी माझा केलेला सत्कार हा माझ्या आयुष्यातील खुप मोठा सोहळा असल्याचे सांगीतले. यावेळी केतन पवार,प्रशांत निकम, संजय भाईप, अजय नलावडे, राजेश कोकाटे, बाबा विचारे, नंदु भुवड, अजय गुजर,आनंद लाड, चंद्रकांत गुडेकर, पंकज डाकवे, मनोज कोकाटे,राजेश चव्हाण,देवराज गरगटे उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)