ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
मसुरे मर्डे येथील वीज ट्रांसफार्मर बदलासाठी मसुरे भाजप तर्फे निवेदन!

मसुरे मर्डे येथील वीज ट्रांसफार्मर बदलासाठी मसुरे भाजप तर्फे निवेदन!

प्रकाशन: 29 Jul 2024 10:00 PM
वाचन संख्या 32

लवकरच सदर ट्रांसफार्मर बदलून देण्याचे वीज वितरण च्या अधिकाऱ्यांचे आश्वासन

मसुरे प्रतिनिधी: मसुरे मर्डेवाडी येथील डॉक्टर भट यांच्या दवाखान्यानजीक असलेला वितरण चा ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाला असून यामुळे येथील वीज ग्राहकांना गेले अनेक दिवस मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. सदरच्या ट्रांसफार्मर वरून वीज पुरवठा कमी जास्त होण्याचा प्रकार होत असल्यामुळे येथील वीज ग्राहकांच्या पाण्याच्या वीज मीटर तसेच घरगुती उपकरणे नादुरुस्त होण्याचे प्रकार वाढलेले होते. या नादुरुस्त ट्रांसफार्मर मुळे येथील ग्राहकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या प्रश्नाबाबत मसुरे भारतीय जनता पक्षाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते शिवाजी परब, माजी पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य जगदीश चव्हाण,दिलीप मुणगेकर आदींनी विरण येथील सहाय्यक अभियंता श्री माने याना लेखी निवेदन देऊन या प्रश्नाबाबत लक्ष वेधले. यावेळी शिवाजी परब यांनी सहाय्यक अभियंता श्री माने यांच्याशी लवकरात लवकर ट्रान्स फार्मर बदलण्याची मागणी केली. वीज वितरण येतील सहाय्यक अभियंता श्री माने यांनी सुद्धा या प्रश्नाबाबत त्वरित ट्रांसफार्मर मागवून घेऊन सदर ट्रांसफार्मर बदलून देण्याचे आश्वासन मसुरे भाजपच्या शिष्टमंडळास दिले. ग्रामपंचायत सदस्य जगदीश चव्हाण यांनी महाराष्ट्र वीज वितरण च्या अधिकारी वर्गाचे आभार मानले. यावेळी मसुरे भागातील वीज वितरण च्या विविध प्रश्नांबाबत शिवाजी परब, जगदीश चव्हाण यांनी चर्चा केली.

विरण येथे वीज वितरण चे सहाय्यक अभियंता श्री माने यांना निवेदन देताना शिवाजी परब, जगदीश चव्हाण, दिलीप मुणगेकर आदी मान्यवर

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स