राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत ब्युटीज ऑन व्हील्स गृपच्या सदस्यांची उल्लेखनीय कामगिरी.
गृपचे दिवंगत सदस्य कै. संजय नाईक यांचा फोटो असलेला विशेष टी – शर्ट परिधान करुन सदस्य झाले स्पर्धेत सहभागी.
मसुरे | प्रतिनिधी : नुकत्याच कुडाळ येथे संपन्न भ झालेल्या राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉनमध्ये ‘ब्युटीज ऑन व्हील्स गृप कट्टा – पेंडूर’ च्या सदस्यांनी सहभाग घेतला होता.
यामध्ये २१ किमी साठी डॉ. सोमनाथ परब, जगदीश पेंडूरकर, रूपेश भोजणे. १० किमी साठी डॉ मृण्मयी परब, रमेश गावडे, प्रकाश सरमळकर. ५ किमी साठी डॉ .शरद काळसेकर डॉ जी.आर सावंत, लोहार हे सहभागी झाले होते.
या गृपचे सदस्य तथा वराडकर हायस्कूलचे मुख्याध्यापक व पेंडूर गावचे माजी सरपंच श्री संजय नाईक यांचे नुकतेच निधन झाले. ते सर्वांसाठी दायी होते म्हणून गृपच्या सदस्यांनी या स्पर्धेत धावताना सरांचा फोटो असलेले टी – शर्ट परिधान त्यांच्या स्मृती जागवल्या व त्यांना आदरांजली दिली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)