ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातातील मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत.

मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातातील मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत.

प्रकाशन: 16 Jul 2024 09:42 PM
वाचन संख्या 178

जखमींवर मोफत उपचार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई | प्रतिनिधी : डोंबिवली (घेसरगांव) येथून खाजगी बसने पंढरपूर येथे निघालेल्या वारकरी भक्तांचा मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर दि. १५ जुलै रोजी पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातातील मृत व्यक्तींच्या वारसांना शासनातर्फे ५ लाख रुपये मदत देण्याचे आणि जखमींवर शासनातर्फे मोफत उपचार करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केले.

कळंबोली नवीमुंबई येथील महात्मा गांधी मिशन रुग्णालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भेट देऊन जखमींची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. शासन आपल्या पाठीशी असल्याचे रुग्णांना सांगितले. जखमींवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी उपचाराबाबत अधिक माहिती जाणून घेतली. अतीदक्षता विभागात उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांना अधिक उपचारासाठी अन्य रुग्णालयात स्थलांतरीत करावे लागल्यास तसे करावे अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स