मानवता विकास परीषद व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषद संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांचा अध्यात्मिक दौरा संपन्न.
मसुरे | प्रतिनिधी : मानवता विकास परीषदेचे अध्यक्ष व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषदेचे संस्थापक तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत सावंत व सहकारी यांचा व्यापक अध्यात्मिक दौरा संपन्न झाला. यामध्ये त्यांनी परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातल्या राष्ट्रसंत श्री पाचलेगांवकर महाराज यांच्या नैकोट वाडी मुक्तेश्वर आश्रमास भेट दिली व दर्शन घेतले. तसेच पाचलेगाव येथील मुक्तेश्वर आश्रम भेट देत प.पू. पाचलेगांवकर महाराजाच्या जन्मस्थानाला भेट व दर्शन घेतले. बीड, आंबेजोगाई, देवी शक्तीपीठ व परळी वैजनाथ ज्योतीर्लिंग येथेही त्यांनी दर्शन घेतले.
श्रीकांत उर्फ बाळा सावंत यांनी राष्ट्रजागृतीच्या व च्या कार्यास आशिर्वाद घेतले. या दौऱ्यावर श्रीकांत सावंत यांच्यासह उद्योजक श्री. दीपक परब ,श्री शाहू व अरुण चव्हाण सोबत होते. या दरम्यान श्रीकांत सावंत यांच्या विविध चळवळीतील राज्यभरातील सहकारी व कार्यकर्ते यांनी त्यांची भेट घेतली.
या दौर्याबद्दल बोलताना श्रीकांत सावंत म्हणाले की राष्ट्रजागृती, आणि सामाजिक कार्य करताना आपली अध्यात्मिक बैठक अत्यंत महत्वाची असून ती आपल्या कार्याला सामर्थ्य देते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)