ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
श्री. समीर म्हाडेश्वर, कुडाळ यांना सिंधुदुर्ग महाराष्ट्र पत्रकारिता, दशावतार सेवा पुरस्कार जाहीर.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

श्री. समीर म्हाडेश्वर, कुडाळ यांना सिंधुदुर्ग महाराष्ट्र पत्रकारिता, दशावतार सेवा पुरस्कार जाहीर.

प्रकाशन: 15 Jul 2024 11:09 PM
वाचन संख्या 144

समृद्धी पब्लिकेशन व सम्यक सामाजिक संस्था, मुंबई आयोजित राष्ट्रीय एकात्मता गौरव संमेलन, ठाणे येथील कार्यक्रमात होणार पुरस्कार वितरण.

ब्यूरो न्यूज | मुंबई : समृद्धी पब्लिकेशन व सम्यक सामाजिक संस्था, मुंबई आयोजित राष्ट्रीय एकात्मता गौरव संमेलन, ठाणे – २०२४ ‌अंतर्गत, श्री. समीर म्हाडेश्वर, रा.कुडाळ यांना सिंधुदुर्ग महाराष्ट्र पत्रकारिता, दशावतार सेवा पुरस्कार जाहीर झाला आहे.

हा पुरस्कार साहित्य, कला, सामाजिक, क्रिडा, सांस्कृतिक, उद्योग, पर्यटन, अपंग निराधार महिला, वन्यजीव अशा विविध क्षेत्रात उत्तुंग यश संपादन करून राष्ट्रहितासाठी गेली अनेक वर्षे अलौकिक कार्य करण्याची प्रेरणा व उदंड शक्ती समाजात कार्यरत असणाऱ्यांना दिला जातो. यंदा या पुरस्कारासाठी ‌ समीर महाडेश्वर यांची निवड जाहीर झाली आहे.

श्री. समीर म्हाडेश्वर यांना राष्ट्रीय एकात्मता गौरव संमेलनात श्री. मिलिंद गवळी (सुप्रसिद्ध सिने अभिनेते), श्री. मेघराज राजेभोसले, (अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ) व जाकीर ख़ान, (चित्रपट अभिनेते) यांच्या शुभहस्ते रविवार दि. २१ जुलै २०२४ रोजी स. १०.३० वाजता, स्थळ मराठी ग्रंथ संग्रहालय पहिला मजला, ना.अ. रेगे सभागृह, जिल्हा परिषदेसमोर स्टेशन रोड, ठाणे (प). येथे सन्मानित करण्यात येणार आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स