ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कै. संजय नाईक सरांना अभिप्रेत कार्य बॅ. नाथ पै सेवांगण परिवारा मार्फत केले जाईल : श्री. दीपक भोगटे.

कै. संजय नाईक सरांना अभिप्रेत कार्य बॅ. नाथ पै सेवांगण परिवारा मार्फत केले जाईल : श्री. दीपक भोगटे.

प्रकाशन: 13 Jul 2024 01:40 PM
वाचन संख्या 142

दिवंगत मुख्याध्यापक श्री. संजय नाईक यांना बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, कट्टा परिवाराच्या वतीने आदरांजली ; कै. नाईक सरांनी सुचविलेल्या होतकरू मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.

मालवण | प्रतिनिधी : बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, कट्टा येथे
वराडकर हायस्कूल, कट्टा यांचे दिवंगत मुख्याध्यापक श्री. संजय नाईक सर यांना आदरांजली वाहण्यात आली. उपक्रमशील व लोकप्रीय तसेच विद्यार्थीप्रीय मुख्याध्यापक अशी ओळख असलेले श्री. संजय नाईक यांच्या अकाली निधनानंतर कट्टा परीसर व बॅरिस्टर नाथ पै सेवांगण परीवार यांमध्ये शोकाचे वातावरण होते.

या आदरांजली कार्यक्रमाच्या प्रारंभी, कै. संजय नाईक यांचे प्रतिमेस पुष्पहार अपर्ण करून दोपप्रज्वलन करण्यात आले. कै. श्री. संजय नाईक यांनी दिवसांपूर्वीच प्रशालेच्या दोन मुलांना शैक्षणिक मदतीची गरज असल्याचे सेवांगण परिवाराला कळवले होते. आदरांजली कार्यक्रम प्रसंगी के. नाईक सरांनी सुचवलेली ती दोन मुले व आणखी ४ मुले अशा ६ विद्यार्थ्यांना बॅ नाथ पै सेवांगण कट्टा शाखेच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यासाठी श्री. दिलीप गुराम यांनी आर्थिक सहाय्य केले. या ६ ही मुलांना दरवर्षी कै. संजय नाईक स्मृती प्रित्यर्थ १२ वी पर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे.

यावेळी शिक्षक महेश भाट यांनी सांगितले की, गरीब विद्यार्थ्यांना सरांनी नेहमीच सहकार्य केले होते. त्यांना आदरांजली म्हणून ६ मुले दत्तक घेऊन बॅ नाथ पै सेवांगणने उचित अशी आदरांजली वाहिली आहे.

सेवांगणचे श्री. दीपक भोगटे यांनी यावेळी सांगितले की, संजय नाईक हे सेवांगणच्या स्थापने पासून सेवांगणच्या विविध उपक्रमात सहभागी असायचे. शिष्यवृती वर्गाला त्यांनी अनेक वर्ष मार्गदर्शन केले. त्यांची स्मृती कायम स्वरूपी जपण्यासाठी ही ६ विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत दिली आहे. ती त्यांना १२ वी पर्यंत दरवर्षी देण्यात येईल व त्यांना अभिप्रेत असणारे शैक्षणिक कार्य सेवांगणा मार्फत केले जाईल.

या वेळी बॅ नाथ पै सेवांगणचे मालवणचे कार्याध्यक्ष किशोर शिरोडकर, कट्टा शाखेचे अध्यक्ष बापू तळावडेकर, कार्याध्यक्ष शाम पावसकर वराडकर हायस्कूलचे शिक्षक महेश भाट, विश्वस्त दीपक भोगटे, व्यवस्थापक बाळकृष्ण गोंधळी, सिध्देश नांदोसकर, ग्रंथपाल सुजाता पावस्कर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स