ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
लेखी आश्वासन मिळेपर्यंत 'व्हाॅईस ऑफ मिडिया' चे आंदोलन चालूच रहाणार : व्हाॅईस ऑफ मिडियाचे संस्थापक अध्यक्ष श्री संदीप काळे.

लेखी आश्वासन मिळेपर्यंत 'व्हाॅईस ऑफ मिडिया' चे आंदोलन चालूच रहाणार : व्हाॅईस ऑफ मिडियाचे संस्थापक अध्यक्ष श्री संदीप काळे.

प्रकाशन: 10 Jul 2024 03:41 PM
वाचन संख्या 172

मुंबईतील आझाद मैदानावर व्हाॅईस ऑफ मिडियाच्या आंदोलनाचा दुसरा टप्पा.

मुंबई | प्रतिनिधी : व्हाॅईस ऑफ मिडिया द्वारा पत्रकारांच्या विविध प्रश्नांबाबत व मागण्यांसाठी गेल्या आठवड्यात राज्यात ३४२ ठिकाणी आंदोलन करण्यात आले होते. राज्यातील वर्तमानपत्र, टीव्ही, रेडीओ, सोशल मीडिया या पत्रकारांच्या महत्वपूर्ण असलेल्या मागण्या संदर्भात ‘व्हॉईस ऑफ मिडीया’ या देशातील सर्वाधिक पत्रकार सदस्य असलेल्या ४१ देशात पत्रकार असलेल्या संघटनेच्या वतीने आजपासून आझाद मैदानावर ‘व्हॉईस ऑफ मिडीया’च्या वतीने उपोषण सुरु आहे. जोपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मागण्यासंदर्भात लेखी आश्वासन देणार नाहीत. तोपर्यंत हे उपोषण असेच सुरू राहील, असा इशारा व्हॉईस ऑफ मिडीयाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी दिला आहे. या आंदोलनानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी शिष्टमंडळाला बोलावून तुम्ही आंदोलन करू नका असे आश्वासीत केले होते, पण जोपर्यंत मुख्यमंत्री शिंदे लेखी आश्वासन देणार नाही तो पर्यंत आंदोलन असेच सुरू राहील असे ‘व्हॉईस ऑफ मिडीया’च्या वतीने स्पष्ट करण्यात आले होते. आंदोलनाचा दुसरा टप्पा आजपासून आझाद मैदानावर ‘व्हॉईस ऑफ मिडीया’ आपल्या सर्व पदाधिकारी यांना घेवून उपोषणास आहेत. राज्यातील सर्व पत्रकारांचे या उपोषणाकडे लक्ष लागले आहे. सकाळी १० वाजल्यापासून आझाद मैदानावर या उपोषणाला सुरूवात झाली असून राज्याभरातून अनेक पत्रकार या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

‘व्हॉईस ऑफ मिडीया’ चे मुख्य संयोजक तथा कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर यांनी राज्यातील ‘व्हॉईस ऑफ मिडीया’चे सर्व पदाधिकारी, पत्रकार यांना या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 87
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 438

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स