पळसंब येथील सौ. रुपाली सावंत यांचे निधन.
आचरा | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील पळसंब गावठणवाडी येथील सौ. रुपाली तुकाराम सावंत ( वय ६० वर्षे ) ह्यांचे, ९ जुलै रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे ,सुन असा परिवार आहे.
श्री. जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ पळसंब आणि पळसंब गांव यांच्या वतीने माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी सौ. रुपाली सावंत यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून, पळसंब वासिय त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)