बांदा रोटरी क्लब प्रेसिडेंट व नूतन पदाधिकार्यांचा पदग्रहण सोहळा १० जुलै रोजी ; माजी जिल्हा गव्हर्नर आनंद कुलकर्णी रहाणार उपस्थित.
बांदा | राकेश परब : बांदा रोटरी क्लबची, रोटरीच्या नियमानुसार नूतन पदाधिकारी निवड करण्यात आली आहे. आगामी एका वर्षासाठी रो. सीताराम गावडे यांची बांदा रोटरी क्लबच्या प्रेसिडेंट पदी निवड झाली आहे. नूतन पदाधिकार्यांचा पदग्रहण सोहळा बुधवारी १० जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता स्वामी समर्थ सभागृहात माजी जिल्हा गव्हर्नर आनंद कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती मावळते प्रेसिडेंट रो प्रमोद कामत यांनी रोटरी क्लबच्या सभे मध्ये दिली.
प्रेसिडेंट रो. सीताराम गावडे
रो. शिवानंद भिडे. ( सचिव )
रो. स्वप्नील धामापूरकर. ( खजिनदार )
सचिवपदी रो शिवानंद भिडे व खजिनदारपदी रो. स्वप्नील धामापूरकर यांची निवड करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी नूतन प्रेसिडेंट रो. सीताराम गावडे, मावळते प्रेसिडेंट रो. प्रमोद कामत, संस्थापक प्रेसिडेंट रो. मंदार कल्याणकर, रो. सुदन केसरकर, रो. योगेश परुळेकर, रो. रत्नाकर आगलावे, रो. हनुमंत शिरोडकर, रो. सुधीर शिरसाट, रो. आपा चिंदरकर, रो. सचिन मुळीक, रो. फिरोज खान तसेच अन्य रोटरी क्लब सदस्य उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)