शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांना सुट्टी ; अती वृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने केले जाहीर.
सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता, अती वृष्टीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाकडून उद्या ९ जुलै रोजी शाळांना शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यात महाविद्यालय, शाळा, शैक्षणिक संस्था यांच्यासाठी ही सुट्टी देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुट्टे यांनी आज सायंकाळी दिले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)